Thursday, March 30, 2023

उदयनराजेंचे राजकीय पुनर्वसन; राज्यसभेचे तिकीट मिळणार?

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या उदयनराजे भोसले यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यांना राज्यसभेच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात राज्यसभेच्या सात जागांची मुदत संपणार आहे. यावेळी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

उदयनराजेंना केंद्रात पाठवण्याचा निर्णय नक्की झाला, तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांची खासदारकी अडचणीत येऊ शकते. कारण दोघांपैकी एका जागेवर भाजप उदयनराजेंना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे शरद पवार, अ‍ॅड. माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे.

राज्यसभेसाठी खुले मतदान असल्याने आघाडीचे पाच आणि भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून जाऊ शकतात. मात्र निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार दिल्यास सातव्या जागेसाठी सामना रंगणार आहे.