हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता इस्रो (ISRO) सूर्यावर नजर ठेवून आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो आदित्य-L1 लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात नुकतीच इस्त्रोकडून एक मोठी माहिती जाहीर करण्यात आली आहे. येत्या 2 सप्टेंबर रोजी इस्रो आपले आदित्य -L1 मिशन लाँच करणार आहे. श्रीहरिकोटा येथून सकाळी ठीक 11.50 वाजता आदित्य-L1 मिशन लाँच केले जाईल. आदित्य-L1 चे लॉन्चिंग पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिक ही नोंदणी करू शकतात. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोकडून ही पहिली मोहीम राबविण्यात येत आहे.
नुकतीच इस्रोची चंद्रयान3 मोहीम यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यानंतर आता इस्रो सूर्याच्या अभ्यासासाठी पाऊल उचलत आहे. यासाठी येत्या 2 सप्टेंबर रोजी इस्रो श्रीहरिकोटा येथून आदित्य-L1 मिशन लाँच केले जाईल. या मिशनच्या अंतर्गत सूर्याचा अभ्यास केला जाईल. सूर्यावरील हवामानाची गतिशीलता, सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम आणि ओझोन थर अशा बऱ्याच गोष्टींचे संशोधन या मिशनअंतर्गत केले जाईल. त्यामुळे ही मोहीम देखील तितकेच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ISRO to launch Aditya-L1 mission to study Sun on September 2
Read @ANI Story | https://t.co/MJmu1ESnpk#ISRO #AdityaL1 #Sun #SolarMission pic.twitter.com/6Hz5nsD5Vu
— ANI Digital (@ani_digital) August 28, 2023
महत्वाचे म्हणजे, आदित्य-L1 मिशनचे लॉन्चिंग सर्वसामान्य नागरिकांना पाहता येईल. यासाठी फक्त त्यांना नोंदणी करावी लागणार आहे. तर घरबसल्या प्रक्षेपण पाहण्यासाठी इस्रोने आपल्या वेबसाइटवर नोंदणी लिंक दिली होती आहे. जिच्या माध्यमातून आपल्याला आदित्य-L1 मिशनचे लॉन्चिंग पाहता येईल.
दरम्यान, ISRO ने हाती घेतलेली आदित्य एल-1 मोहीम सर्वात गुंतागुंतीची असेल. या मोहिमअंतर्गत यानाला पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणाऱ्या लॅरेंजियन पॉईंटवर आदित्य ठेवण्यात येईल. लॅरेंजियन पॉईंट अंतराळातील पार्किंगची जागा आहे. या भागात अगोदरपासूनच काही उपग्रह तैनाब आहेत. या ठिकाणी राहून आदित्य एल 1 सूर्याचा अभ्यास करेल.. या मोहिमेअंतर्गत पहिल्यांदाच सूर्यमालेत स्पेस ऑब्जर्वेटरी तैनात केले जाईल.