हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिशा सालियन मृत्यु प्रकरणामुळे आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अडचणी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आता दिशा सालियन मृत्युची एसआयटी चौकशी होणार आहे. महत्वाचे म्हणजे, याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे या चौकशीच्या माध्यमातून सत्ताधारी ठाकरे गटाला पुन्हा एकदा घेरणार असल्याचे म्हटले जात आहे.
आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून आदित्य ठाकरे यांच्या चौकशीची चर्चा रंगली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणामुळे आदित्य ठाकरेंवर वारंवार आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी भाजपचे जेष्ठ नेते नारायण राणे यांनी त्यांच्याकडे या प्रकरणाचे काही पुरावे असल्याचे देखील सांगितले आहे. तसेच, आदित्य ठाकरेंनी काहीही केले नसेल तर त्यांनी चौकशीला घाबरण्याचे कारण काय? असा सवाल गिरीश महाजन कडून उपस्थित करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांची चौकशी अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली होण्याची शक्यता आहे. बरोबर एक वर्षापूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली होती. त्यानंतर आता कुठे प्रत्यक्षात एसआयटी चौकशीबाबत आदेश निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात सर्वात प्रथम आदित्य ठाकरेंची चौकशी करण्यात येईल असे म्हणले जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
9 जून 2020 ला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हीजाम मृत्यू झाला होता. पुढे पाच दिवसांनंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू झाला. पोलिसांनी दिशा सालियन हिचा मृत्यू मुंबईच्या मालाडमधल्या एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन खाली कोसळल्यामुळे झाली असल्याची माहिती दिली होती. परंतु, दिशा सालियन हिच्या मृत्यू मागे कोणाचातरी हात असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता. यादरम्यानच या प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा देखील संबंध असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून विरोधकांनी आदित्य ठाकरेंवर या प्रकरणामुळे निशाणा साधण्यास सुरुवात केली.