सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 257 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 53 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 24 हजार 76 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 62 हजार 811 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 35 हजार 43 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3592 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दिवसभरात 30 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
दूध संकलन केंद्रे सुरु करण्याचा सुधारीत आदेश
कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयात जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार दि .22 मे च्या आदेशानुसार दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशात पुढील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे. “ दूध संकलन केंद्रे सकाळी 7 ते 9 व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील. वितरणाबाबत फक्त घरपोच दूध वितरणास परवानगी असेल.