सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
देवराष्ट्रेच्या दत्ता लोहार यांनी बनवलेल्या मिनी जिप्सी पाठोपाठ सांगलीतील आणखी एक ब्रिटिशकालीन फोर्ड गाडी चर्चेत आली आहे. ही गाडी बनवलीय सांगलीतील अशोक आवटी या दुचाकी आणि ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करणाऱ्या मॅकेनिकने. दता लोहार यांच्याप्रमाणे अशोक आवटी यांनी देखील भंगारातील एमएटी आणि रिक्षाचे साहित्य वापरून, जुगाड करत ही 1930 सालची ही फोर्ड गाडीची हुबेहूब गाडी बनवलीय. अशोक आवटी यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे.
सध्या ते सांगली-कर्नाळ रोडवरील गॅरेजचे चालक आहेत… काकानगर मध्ये टू व्हीलर गाड्या व ट्रॅक्टर दुरुस्तीचं गॅरेज असलेल्या अशोक यांनी केवळ आपल्या कल्पकता आणि 2019 ला सुरू झालेल्या लॉकडाऊन काळात you tube वर चे व्हिडिओ पाहून एक घरात एक चार चाकी गाडी मुलाना खेळण्यासाठी असावी याचे स्वप्न पाहिले. आज अडीच वर्षानंतर अशोक आवटीचे स्वप्न प्रत्यक्षात रस्त्यावर उतरलय ते या फोर्ट गाडीच्या रुपात.. रिक्षा प्रमाने हँड किक वर सुरु होणारी ही गाडी प्रेटोल वर चालते…30 किमी इतका मायलेज देते.
अगदी कमी वयापासून अशोक यांना गाड्या दुरुस्तीचा छंद जडला. गॅरेज थाटले. गाड्या दुरूस्त करता-करता अनेक वस्तू, मशीन खोलाखोलीचा नाद लागला. वेगवेगळ्या गाड्या माॅडिफाय केल्या. याचं पार्ट त्याला त्याचं याला, अशी उसाबर केली. चांगलं आणि वेगळं बनवायचा प्रयत्न केला. आता चारचाकी गाडी बनवायचं मनावर घेतलं आणि दोन वर्षे खपून पठ्ठ्यानं गाडी तयार केलीही. भंगारातील एमएटी गाडीचं इंजिन आणि रिक्षाचे हब आणि आणखी काही पार्टचा जुगाड कररून आणि लोखंडी पत्रा आणि अँगल पासून ही १९३० ची अलिशान FORD साकार झाली आहे. फक्त तीस हजार खर्च आला आहे. गाडीला led लाइट आहेत, इंडिकेटर , हॉर्न अशी ही सेम टू सेम फोर्ड गाडी आहे असे वाटत.