Anil Babar Death : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

Anil Babar Death

Anil Babar Death । शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात भरती करण्यात आलं होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघाचे ते आमदार होते. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी अनिल बाबर यांची ओळख होती. आज त्यांचं निधनाने राजकीय … Read more

सांगली रेल्वे स्टेशनचा मोठा विक्रम; वर्षभरात 12 लाख प्रवाश्यांनी केला प्रवास

Sangli Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सोपा आणि खिशाला परवडणारा आहे. त्यामुळे अनेक भारतीय हे प्रवास लांबचा असो वा जवळचा रेल्वेनेच जाणे पसंत करतात. यामुळे रेल्वे विभागाला आर्थिक फायदा होतो आणि प्रवाश्यांना इतर सोयी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली रेल्वे स्टेशनने (Sangli Railway Station) मोठा विक्रम केला आहे. … Read more

सांगली रेल्वे स्टेशनचा महाराष्ट्रात डंका!! स्वच्छतेच्या बाबतीत ठरलं No 1

Sangli Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील रेल्वे स्थानकातील (Railway Station) स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी रेल्वेने ” मेरा स्टेशन मेरा अभिमान 2023 ” हे विशेष अभियान राबविले. या मोहिमेत मध्य रेल्वे मधील बहुतांश स्थानकांचा सहभाग होता. मात्र या अभियाना अंतर्गत रेल्वे स्थानकांना देण्यात आलेल्या श्रेणित मोठ्या स्थानक गटामध्ये सांगली रेल्वे स्टेशन (Sangli Railways Station) नंबर वन ठरलं आहे. … Read more

आश्रम शाळेतील 170 मुलांना विषबाधा; सांगलीतील घटनेनं खळबळ

Poisoning Children sangali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जत तालुक्यातील उमदी येथील एका आश्रम शाळेतील जवळपास 170 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. समता आश्रम शाळेत ही घटना घडली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर प्रशासनही जागे झालं असून २४ तासांत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, जेवणातील बासुंदीतून या … Read more

Sangli News : पोलिस असल्याची बतावणी करत भरदुपारी गोळीबार; कोट्यवधीचे दागिने लुटले

सांगली : शहरातील वसंतदादा मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीत असलेल्या रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर आज सशस्त्र दरोडा टाकत कोट्यवधी रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले. पोलिस असल्याचा बनाव करून पेढीत शिरलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने कर्मचाऱ्यांचे हात-पाय बांधून, तोंडावर चिकटपट्टी लावून कानपटीवर बंदूक ठेवत दागिने, हिरे आणि चोख सोन्यावर दरोडा टाकला. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे डीव्हीआर फोडून टाकत पुरावे … Read more

Sangli News : रागाने बघितलं म्हणून तरुणाचा निर्घृण खून; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा राडा

Sangli News

सांगली (Sangli News) : सांगलीत एखादा खून कशा कारणाने होईल हे आता काही सांगता येत नाही. केवळ रागाने बघितल्याच्या कारणातून एका महाविद्यालयीन तरुणाला आपला भर रस्त्यात जीव गमवावा लागलाय. महाविद्यालयीन तरूणावर धारधार शस्त्राने हल्ला चढवत निर्घृण खून करण्यात आला. राजवर्धन रामा पाटील (वय १८, रा. मतकुणकी, ता. तासगाव) असे त्या तरूणाचे नाव आहे. वसंतदादा साखर … Read more

शिराळा तालुक्यात 6 गव्याचा संशयास्पद मृत्यू : विषबाधेचा अंदाज

wheat

शिराळा प्रतिनिधी। आनंदा सुतार रिळे (ता. शिराळा) येथे दोन नर व तीन माद्या अशा पाच गव्यांचा संशयास्पद मृत्यू झाला असुन सदरचा विष बाधेने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जाता आहे. तर शांतीनगर येथील वनविभाग हद्दीत वृद्धापकाळाने मृत्यू झालेला गवा दोन दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळला. त्यामुळे मृत गव्यांची संख्या सहा झाली. या घटनेने तालुक्यात … Read more

सांगली हादरली!! एकाच कुटुंबातील 9 जणांची सामूहिक आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना आज घडली असून मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये एकाच कुटूंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस पंचनामा सुरू असून अधिक या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील माणिक यल्लाप्पा व्हनमोरे आणि पोपट यल्लपा … Read more

मका फॅक्टरीत काम करताना हात तुटलेल्या कर्मचाऱ्याला 45 लाखांची मदत देण्याची कर्मचारी संघटनेची मागणी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली शहरातील अहिल्यानगर मध्ये असणाऱ्या संजय इंडस्ट्रियल इस्टेट येथील स्मिता इंटरप्रायझेस या मका फॅक्टरी काम करत असताना एका कर्मचाऱ्याचा हात मशीन मध्ये अडकून तो तुटला. सदरची घटना हि १० मार्च रोजी घडली. जामुद्दिन आलम असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. फॅक्टरीच्या मालकांनी त्या कर्मचाऱ्याला तुटपुंजी मदत देऊन बाहेर पाठविले. यानंतर … Read more

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नामुळे हरवलेला अल्पवयीन मुलगा सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि प्रयत्नातून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील सात वर्षाच्या हरवलेल्या मुलाच्या कुटुंबाचा शोध घेऊन सुखरूपपणे त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली व चाइल्ड लाईन यांच्या संयुक्त मोहिमेमुळे हरवलेल्या मुलाच्या आई-वडिलांशी संपर्क करुन त्याची पालकांशी भेट घडविणे शक्य झाले. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव … Read more