ई-तिकीटिंग सिस्टीम आणखी वेगवान करण्यासाठी Railway कडून सल्लागार कंपनीची नियुक्ती !!!

Railway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway कडून आता पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीममध्ये अनेक बदल करण्याच्या तयारी केली जात आहे. Railway च्या पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम (PRS) च्या सध्याच्या सिस्टीमचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा सुचवण्यासाठी ग्रँट थॉर्नटन या एडव्हायझरी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या फर्मच्या रिपोर्ट नंतर या वर्षअखेरीस रिझर्वेशन सिस्टीममध्ये सुधारणा केली जाऊ शकते.

All you need to know about consumer protection in railway services - iPleaders

हे ध्यानात घ्या कि, IRCTC कडून सध्याच्या तिकीट सिस्टीमचा अभ्यास केला जात आहे. Railway मंत्रालयाने संसदेच्या समितीला ही माहिती दिली आहे. या समितीच्या मते, जास्तीत जास्त ट्रॅफिक हाताळण्यासाठी IRCTC वेबसाइट/सर्व्हर्सची क्षमता आणखी मजबूत आणि नियमितपणे अपग्रेड करणे आवश्यक आहे. या रिपोर्ट्स नुसार, वेबसाइट आणि Apps आणखी सुरक्षित केले जातील जेणेकरून बनावट युझर्सची समस्या थांबवता येऊ शकेल.

ई-तिकीटिंग सिस्टीममध्ये सुधारणा झाल्याने सर्वसामान्यांचा होणार फायदा

समितीने म्हटले आहे की, ई-तिकीटिंग फक्त प्रवाशांसाठीच सोयीचे नाही तर याद्वारे Railway काउंटरवरील गर्दी देखील कमी होण्यास मदत होईल. या समितीच्या म्हणण्यानुसार, यामुळे दलालांच्या समस्येला आळा घालण्यास आणि काउंटरवर बनावट नोटा मिळण्याची शक्यता तपासण्यास मदत होईल.

New IRCTC e-ticketing website & app launched! Check full list of passenger-friendly features - Times of India

संसदेत सादर केला अहवाल

भाजप खासदार राधामोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील Railway च्या स्थायी समितीचा रिपोर्ट संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आला. या रिपोर्टमध्ये समितीने म्हटले आहे की, 2019-20 या वर्षात IRCTC वेबसाइट किंवा App द्वारे ऑनलाइन बुक केलेल्या तिकिटांची संख्या आरक्षण केंद्राच्या साइटवर खरेदी केलेल्या तिकिटांपेक्षा 300 टक्क्यांनी जास्त आहे. या रिपोर्टमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, वेबसाइट सामान्यत: संथ असते आणि विशेषत: पीक अवर्समध्ये तिकीट बुक करण्यासाठी जास्त वेळ घेते.

IRCTC users can now book 12 tickets a month from single ID, know the process

तिकीट बुकिंग आकडेवारी

Railway मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2016-17 मध्ये भारतीय रेल्वेच्या एकूण आरक्षित तिकिटांमध्ये ई-तिकिटांचा वाटा 59.9 टक्के होता. त्याच वेळी, ते 2016-17 मध्ये 65.8 टक्के, 2018-19 मध्ये 70.1 टक्के, 2019-20 मध्ये 72.8 टक्के, 2020-21 मध्ये 79.6 टक्के आणि 2021-22 मध्ये डिसेंबरपर्यंत 80.5 टक्के झाले. रेल्वेच्या मते, IRCTC कडे 10 कोटी रजिस्टर्ड युझर्स असून 760 कोटी ऍक्टिव्ह युझर आहेत.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/

हे पण वाचा :

Milk Price : देशाच्या इतर भागांच्या तुलनेत ‘या’ शहरामध्ये कमी दराने मिळते दूध !!!

Railway कडून आज 142 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे लिस्ट पहा

Aadhar Card द्वारे सरकार देणार 5 लाखांपर्यंतचे कर्ज !!! मेसेज मागील सत्य जाणून घ्या

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे नवे दर तपासा

Indusind Bank ने वाढवले ​​FD वरील व्याजदर, जाणून घ्या किती होणार फायदा !!!