Indusind Bank ने वाढवले ​​FD वरील व्याजदर, जाणून घ्या किती होणार फायदा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indusind Bank : RBI कडून रेपो दरात वाढ सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यानंतर जवळपास सर्वच बँकांकडूनही आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांनी आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली आहे. या दरम्यानच आता Indusind Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याजदरात वाढ केली आहे.

Indusind Bank'S Hindujas Welcome Rbi Move To Up Promoter Holding To 26%

नवीन दर 12 ऑगस्ट 2022 पासून लागू

हे लक्षात घ्या कि, 12 ऑगस्ट 2022 पासून Indusind Bank चे नवीन दर लागू होतील. ही दरवाढ 2 कोटींपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरासाठी केली गेली आहे. या बदलानंतर, आता बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर सर्वसामान्यांसाठी 3.50 टक्के ते 6.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.25 टक्के ते 7.50 टक्के व्याजदर दिला जाईल.

IndusInd Bank Q1 results: Net profit almost doubles to ₹1,016 cr | Mint

असे असतील एफडीचे दर

Indusind Bank ने आता 7 दिवस ते 14 दिवसांच्या FD कालावधीसाठीचा व्याजदर 2.75 टक्क्यांवरून 3.50 टक्के केला आहे. तर 15 दिवस ते 30 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर 3.00 टक्क्यांवरून 3.50 टक्के करण्यात आला आहे. तसेच 31 ते 45 दिवसांच्या FD वर आता 4.00% व्याज मिळेल. 46 दिवसांपासून ते 60 दिवसांपर्यंतच्या FD मुदतीसाठी, आता 4.0% व्याजदर दिला जाईल.

त्याच प्रमाणे 61 दिवस ते 90 दिवसांच्या FD कालावधीसाठी Indusind Bank ने व्याजदर 3.75 टक्क्यांवरून 4.25 टक्के केला आहे. बँकेने 91 दिवस ते 120 दिवसांच्या FD वरील व्याजदर 4.00% वरून 4.50% पर्यंत वाढवला आहे. तसेच आता 121 दिवसांपासून 180 दिवसांपर्यंतच्या FDसाठीचा व्याजदर बँकेने 4.50% वरून 4.75% केला आहे. त्याच वेळी, बँकेने 181 दिवस ते 210 दिवसांच्या FD वरील व्याजदर 4.75% वरून 5.0% पर्यंत वाढवला आहे.

Bharat Financial Inclusion: IndusInd Bank appoints Deloitte to review whistleblower allegations at arm Bharat Financial, CFO News, ETCFO

आता Indusind Bank कडून 211 दिवस ते 269 दिवसांच्या FD वर 5.00% च्या तुलनेत 5.25% व्याजदर दिला जाईल तर 270 दिवस किंवा 354 दिवसांच्या FD वर 5.50% व्याजदर मिळत राहतील. तसेच बँक 355 दिवस किंवा 364 दिवसांच्या FD वर 5.50% व्याजदर देत राहील. बँकेने 1 वर्षापासून 1 वर्ष 6 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 6.00% वरून 6.25% पर्यंत व्याजदर वाढवला आहे.

इथे हे लक्षात घ्या की, अलीकडेच RBI ने रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला आहे. सध्याचा रेपो दर हा गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.indusind.com/in/en/personal/deposits/fixed-deposit.html

हे पण वाचा :

‘या’ Multibagger Stock गेल्या 15 वर्षात गुंतवणूकदारांना बनवले करोडपती !!!

Home Loan : SBI चा ग्राहकांना मोठा धक्का !!! होम लोन 0.50 टक्क्यांनी महागले

महाविकास आघाडीचे सरकार हे लबाडच निघाले; फडणवीसांची घणाघाती टीका

5 हजार रुपये ते 46 हजार कोटींचे मालक असा आहे Rakesh Jhunjhunwala यांचा शेअर बाजारातील प्रवास !!!

Rakesh Jhunjhunwala यांना कोणत्या शेअर्समुळे नफा अन् नुकसान झाले ते पहा !!!