शिवसेनेत प्रवेश करणार का? उज्ज्वल निकम म्हणतात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आज त्यांनी शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. जवळपास १५ ते २० मिनिटं उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु होती.

एकनाथ शिंदे भेटीनंतर उज्ज्वल निकम हे शिवसेनेत प्रवेश करणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली असून मी अद्याप राजकारणात येण्याचा विचार केलेला नाही़ असं म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या चर्चेचा तपशील सांगू शकत नाही असं म्हणत यापूर्वी मी शरद पवार यांचा प्रस्तावही नाकारला होता. माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ते घरी येत असतात,” असंही त्यांनी सांगितलं आहे.