“फाशी तर फाशी…’जन्नत’मध्ये गेल्यास अप्सरा मिळेल”; आफताबचा खळबळजनक जबाब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला याला दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याची काल पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. चाचणीनंतर त्याला लॅबमधून जेलमध्ये घेऊन जात असताना हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पॉलिग्राफ चाचणीत आफताबने धक्कादायक जबाब दिला आहे. आफताबने आनंदानं फाशी जाईल स्वर्गात अप्सरा मिळेल, असे म्हंटले.

नवी दिल्लीत पॉलिग्राफ चाचणीनंतर आफताबला पोलीस व्हॅनमधून नेले जात असताना त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर अफताबने त्याच्या जबाबात दिलेली माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. त्यांनी म्हंटले की, आफताबने आनंदानं फाशी जाईल स्वर्गात अप्सरा. मिळेल, असे म्हटले आहे. तर श्रद्धासोबतच्या नात्यादरम्यान त्याने अजून एक महत्वाची माहिती दिली ती म्हणजे त्याने श्रद्धा अगोदर २० पेक्षा अधिक हिंदू मुलींसोबत संबंध ठेवले होते.

आफताब ‘या’ अॅपच्या साह्याने अडकवायचा मुलींना जाळ्यात

पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आफताब हिंदू मुलींना बंबल अॅपवर शोधून आपल्या जाळ्यात अडकवायचा. श्रद्धाला मारल्यानंतर त्याने एका मानसशास्त्रज्ञाला त्याच्या खोलीत आणले होते, तीही हिंदू होती. यावेळी त्याने श्रद्धाची अंगठी भेट देऊन तिला आपल्या जाळ्यात अडकवले. याशिवाय तो आणखी काही हिंदू मुलींच्या संपर्कात होता. तसेच, श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही, असे तो म्हणाला.

आफताबवर तलवारीचा हल्ला

आफताबला काल पॉलिग्राफ चाचणीसाठी दिल्लीतील रोहिणी भागातील ‘एफएसएल’ कार्यालयात आणण्यात आले. चाचणीनंतर सायंकाळी पोलीस आफताबला पुन्हा तिहार कारागृहात घेऊन जाण्यासाठी निघाले असता, हातात तलवारी घेऊन आलेल्या तरुणांनी आफताबवर तलवारीनं वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तरुणांना रोखण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्यानं बंदूक काढत हवेत गोळी झाडण्याचा इशारा दिला.