Wednesday, October 5, 2022

Buy now

एखादी व्यक्ती एका वर्षात किती घाम गाळते? उत्तर ऐकून तुम्हांला फुटेल घाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घाम येणे हा मानवी जीवनाचा एक सामान्य भाग आहे. घरातील कामे करताना किंवा व्यायाम करताना आपल्या शरीराला घाम येतो. अनेक वेळा मेडिकल कंडिशनमुळेही कुणाकुणाच्या शरीरातून जास्त तर कुणाच्या शरीरातून कमी घाम येतो. निसर्गाने प्रत्येक गोष्टीला कारण दिले आहे. आज आपण घाम येणे शरीरासाठी कसे चांगले आहे आणि एखाद्या व्यक्तीला वर्षभरात किती घाम येतो हे जाणून घेणार आहोत.

शरीरातून घाम येणे ही चांगली गोष्ट आहे. यामुळे शरीरासाठी अनेक फायदे होतात. सहसा एखाद्या व्यक्तीला असे वाटते की, त्याचे कपडे घामाने ओले झाले आहेत. मात्र त्याच्या अंगातून किती घाम निघाला हे त्याला कळत नाही? स्किनकेअर फर्म निव्हियाने आता यावर उत्तर दिले आहे. हे उत्तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्या नवीन रिसर्चनंतर, निव्हियाने सांगितले की,’एक व्यक्ती एका वर्षात 278 गॅलन म्हणजे 12 ते 64 लिटर घाम गाळते.’

हा आकडा सामान्य भाषेत समजला तर एका व्यक्तीला एका वर्षात सुमारे 5 बादल्या घाम येतो. म्हणजे सुमारे 2 लाख 56 हजार 445 चमचे घाम. या स्किनकेअर कंपनीने सांगितले की, 15 ते 82 लोकांचा घाम एकाच ठिकाणी जमा केला तर त्यातून एक छोटासा तलाव तयार होऊ शकेल. इतक्या घामामुळे लंडनचे एक्वेरियम भरले जाईल. घामाचे हे प्रमाण नॉर्मल लाइफमध्ये आहे. जर एखादी व्यक्ती व्यायाम करत असेल तर घामाचे प्रमाण वाढते.

जेव्हा एखादी व्यक्ती फिझिकल एक्टिविटी करत असते तेव्हा त्याच्या शरीरातून तासाभरात अर्धा ते दोन लिटर घाम येतो. त्याच वेळी, ज्यांना खूप घाम येतो, ते सुमारे तीन लिटर घाम गाळतात. या रिपोर्टमध्ये घामाशी संबंधित अनेक तथ्ये समोर आली आहेत. महिलांमध्ये घामाच्या ग्रंथी पुरुषांपेक्षा जास्त असल्या तरी पुरुषांना त्यांच्यापेक्षा जास्त घाम येतो, असे सांगण्यात आले. याशिवाय घाम येणे हे हवामान आणि लठ्ठपणा यावरही अवलंबून असते.