हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| घर घ्यायचे असो किंवा एखादी महागडी वस्तू घ्यायची असो त्यासाठी सर्वसामान्य व्यक्तीला कर्ज काढावेच लागते. हे कर्ज त्यांना सरकारी आणि खाजगी बँकांमधून (Bank Loan) मिळते. या कर्जामुळे त्यांनी साकारलेले स्वप्न पुर्ण करू शकतात. महत्वाचे म्हणजे हे कर्ज परत फेडण्यासाठी ईएमआयचा पर्याय असतो. परंतु बऱ्याचदा कर्ज फेडल्यानंतर व्यक्ती पुढे काम करायची विसरून जातात. ही कामे कोणती आहेत आणि ते इतकी आवश्यक आहे याविषयी जाणून घ्या.
मूळ कागदपत्रे घेणे
गृह कर्ज घेतल्यानंतर आणि त्या कर्जाची परतफेड केल्यानंतर घराची ओरिजनल कागदपत्रे बँकेकडून घ्यावी लागतात. ही कागदपत्रे सुरुवातीला आपण बँकेत जमा केलेली असतात. परंतु कर्ज पुन्हा फेटल्यानंतर ती कागदपत्रे आपल्याकडे घ्यावी लागतात.
कोणतेही देय नाही हे प्रमाणपत्र घ्या
कर्ज फेडल्यानंतर बँकेकडून किंवा ज्या व्यक्तीकडून कर्ज घेतले आहे त्याच्याकडून थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र अवश्य घ्या. हे प्रमाणपत्र पुरावा असतो की तुम्ही पूर्ण कर्ज फेडले आहे. यामुळे पुन्हा तुमच्याकडून कोणीही कर्ज बाकी आहे जास्त पैसे घेऊ शकत नाही.
क्रेडिट प्रोफाइल अपडेट करून घ्या
कर्जाची परतफेड केल्यानंतर क्रेडिट प्रोफाइल अपडेट करून घ्यायला हवे. यामुळे भविष्यात तुम्हाला पुन्हा कर्ज घ्यायचे असेल तर कोणतीही अडचण जाणवणार नाही. यासह क्रेडिट स्कोअर कर्ज परतफेड झाल्यानंतर सतत तपासात रहा.
भार नसलेले प्रमाणपत्र घ्या
कर्जाची परतफेड झाल्यानंतर तुम्हाला भार नसलेले प्रमाणपत्र देण्यात येते. हे प्रमाणपत्र तुमच्यासाठी कायदेशीर दस्तऐवज असते. ज्यात परतफेडीचे सर्व तपशील दिलेले असतात. हे प्रमाणपत्र तुमच्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे कर्ज थकीत नसल्याचा अत्यंत महत्त्वाचा पुरावा असतो. त्यामुळे हे प्रमाणपत्र नक्की घ्या.