कराड : तालुक्यातील येणके येथे शनिवार दिनांक 27 रोजी सकाळी 7.30 वाजता वन विभागाने एका बिबट्यास सापळ्यात जेरबंद करून ताब्यात घेतले आहे. तर त्यानंतर अवघ्या तासाभरात 8.30 वाजता याच गावात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने या गावात असणाऱ्या बिबट्याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांच्यातून केली आहे. येणके येथे एक बिबट्या जेरबंद करताच दुसर्या बिबट्याने दर्शन दिल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे.
कराड तालुक्यातील येणके- किरपे मार्गावर असणाऱ्या आप्पासाहेब गरुड यांच्या विहिरीजवळ बिबट्या दिसून आला. शेतात काम करण्यासाठी निघालेल्या शशिकांत गरुड राहुल कदम विकास गरुड धनंजय पाटील यांच्या समोरून हा बिबट्या गेल्याचे त्यांनी सांगितले. बिबट्या गावात असलेल्या वस्तीकडे गेल्याने लोकांच्या भीतीचे वातावरण आहे.
एन के येथे आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बळीराम मास्तर यांच्या वस्तीजवळ एक बिबट्या सापळ्यात सापडला होता. बिबट्या सापडल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र तासाभरात दुसरा बिबट्या गावच्या वस्तीकडे येताना दिसल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे एका पाच वर्षाचा मुलाचा मृत्यू या ठिकाणी झाला होता. त्यानंतर वन विभागाने गांभीर्याने बिबट्याची शोध मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.