सचिन नंतर ‘हा’ दिग्गज खेळाडू कोरोनाच्या विळख्यात; रोड सेफटी स्पर्धेत होता सहभाग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता भारताचा आक्रमक खेळाडू युसूफ पठाण याला देखील कोरोना झाला आहे. स्वतः युसुफने ट्विट करत याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे युसुफ पठाण देखील सचिन सोबत रोड सेफटी क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला होता.

युसूफ ट्विट करत म्हणला की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे मी घरातच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. मी आवश्यक ती सर्व खबदरदारी आणि औषध घेतली आहेत. दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्यांनी लवकरात लवकर कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी मी विनंती करतो”,

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंडिया लिजंड्सची टीम चॅम्पियन ठरली होती. या सीरिजमध्ये खेळलेले दोन्ही खेळाडू पॉझिटिव्ह आल्यामुळे आता अन्य खेळाडूंबाबतची साशंकताही वाढली आहे. या सीरिजमध्ये भारताकडून सचिन, सेहवाग, युवराज, इरफान पठाण, युसूफ पठाण, मोहम्मद कैफ, एस.बद्रीनाथ यांच्यासारखे दिग्गज खेळाडू खेळले होते.

You might also like