45 दिवसानंतर आज उघडली बाजारपेठ; सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : तब्बल 45 दिवसानंतर औरंगाबाद जिल्ह्याची बाजारपेठ आज खुली झाली आहेत. सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवेसह सर्वच प्रकाराची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. दुपारी तीन नंतर नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तर शनिवारी आणि रविवारी जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने मॉल्स बंद राहणार आहेत. तसेच हॉटेल बार रेस्टॉरंट आणि दारू दुकानांना पार्सल सेवा कायम असणार आहे. 15 जून पर्यंत हे आदेश लागू राहतील. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आदेश काढले जातील असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासन आस्तिक कुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी 31 मे रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास जाहीर केले. त्यानुसार आज संपूर्ण बाजारपेठा उघड्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात कॉरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक होताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 11 मार्चला अंशतः घोषणा केली होती. हा आदेश 31 मार्च पर्यंत कायम होता. त्यानंतर पुन्हा एक एप्रिलपासून निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सर्व स्तरातून या आदेशाला विरोध झाला. त्यात खासदार इम्तियाज जलील यांनी आदेशाविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शासनाच्या सूचनेवरून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व निर्बंध शिथिल केले होते. त्यानंतर राज्य शासनानेच 14 एप्रिल च्या रात्री आठ वाजेपासून ‘ब्रेक दी चेन’ निर्बंध लागू केले होते. त्यामुळे 15 एप्रिल पासून सर्व बाजारपेठा बंद असल्याने व्यापारी संकटात आले होते. सध्या शहरातील रुग्णसंख्या घटली आहे. त्यासोबतच पॉझिटिव्ह दरही ६ वर आला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार शहरातील सर्व प्रकारची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हे राहणार बंद

शहरातील धार्मिक स्थळे, आठवडी बाजार, कटिंग सलून, ब्युटी पार्लर, स्पा, शॉपिंग मॉल, स्विमिंगपूल, जी, खेळाचे मैदाने, व्यायाम शाळा, रेस्टॉरंट, बार, हॉटेलमध्ये बसून खानपान हे सर्व बंद असेल. तसेच आठवड्यातील सातही दिवस पेट्रोल पंप दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले राहतील.

Leave a Comment