परप्रांतीय मजुरांनी पुन्हा धरली महाराष्ट्राची वाट; रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाउनकडून देशातील जनजीवन हळूहळू अनलॉक होण्याच्या दिशेने जात असताना आपल्या घरी परतलेले बिहार, उत्तर प्रदेशातील परप्रांतीय मजूर पुन्हा महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केल्यानंतर अनेक व्यवसाय, उद्योगधंदे पुन्हा सुरु झाले आहेत. प्रसंगी पायी चालत शेकडो किलोमीटर घरी पोहोचलेले तसंच श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून गेलेले अनेक मजूर, कामगार रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने पुन्हा महाराष्ट्रात परतत आहेत. यामुळे अनेक ट्रेनचं बुकिंग पुढील काही दिवसांसाठी फूल आहे. यामध्ये मुंबई, पुण्यात परतणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

लॉकडाउनमध्ये हाताचे काम जाऊन शहरात अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी १ मे पासून श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आल्या होत्या. या ट्रेनमधून हजारो कामगार आपापल्या घरी गेले होते. यानंतर श्रमिक गाड्या वगळता रेल्वेकडून १ जूनपासून देशभरातून विशेष रेल्वे गाडय़ा सुरू करण्यात आल्या. श्रमिक रेल्वे केवळ एकाच दिशेने सोडण्यात आल्या. मात्र, या विशेष गाड्या दैनंदिन पद्धतीने दोन्ही बाजूने सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळं या विशेष रेल्वे गाडयांच्या माध्यमातून परप्रांतीय मजुरांनी रोजगारासाठी पुन्हा महाराष्ट्राची वाट धरली आहे.

दरम्यान, मुंबई आणि पुलांच्या दिशेने धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांपैकी दानापूर पुणे स्पेशल-दानापूर (पाटणा) ते पुणे ट्रेनचे तिकीट बुकिंग २० जुलैपर्यंत फुल आहे. तर पुष्पक एक्स्प्रेस स्पेशल-लखनऊ ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या गाडीचे १७ जुलैपर्यंत आणि खुशीनगर स्पेशल-बादशाहनगर ते लोकमान्य टिळक टर्मिनस २६ जुलैपर्यंत तिकीट बुकिंग फुल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment