लॉकडाउनदरम्यान किती स्थलांतरीत मजुरांचे मृत्यू झाले? केंद्र सरकार म्हणाले, आमच्याकडे माहितीचं नाही

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका स्थलांतरित मजूर वर्गाला बसला होता. हातावर पोट असणाऱ्या या वर्गाचा लॉकडाऊनमुळे हातचा रोजगार गेला होता. अशा परिस्थितीत उपाशी शहरांत जगण्यापेक्षा लाखो मजुरांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लॉकडाऊनमध्ये प्रवास वाहतूकीची सर्व साधन बंद असल्याने लाखो मजुर हजारो किलोमीटर पायी मूळ गावी जाण्यासाठी निघाले … Read more

हे सरकार गरीब विरोधी, आपात्कालिन परिस्थितीला नफ्यात बदलून कमाई करणारे आहे- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विशेष श्रमिक रेल्वे गाड्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. रेल्वेला श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून ४२८ कोटी रूपयांचा फायदा झाल्याचं नुकतेच एक समोर आलं आहे. या वृत्तावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. देशातील सरकार हे गरीबांच्या विरोधातलं असून संकटात अडकलेल्या लोकांचा फायदा घेत सरकार नफेखोरी करत असल्याचा … Read more

अभिमानास्पद! जवळपास 400 मजुरांच्या कुटुंबीयांसाठी पुन्हा एकदा धावला सोनू सूद, अशा प्रकारे केली मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजुरांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. जेव्हा स्थलांतरित मजूर वाईट स्थितीत घराबाहेर पडले तेव्हा त्यांची चित्रे आणि व्हिडिओंमुळे प्रत्येकाला हलवले. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने ही जबाबदारी स्वीकारली, हजारो प्रवासी कामगारांना त्यांच्या घरीच पाठवले नाही तर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थादेखील केली. सोनूच्या या कार्याचेही खूप कौतुक झाले.लॉकडाउन … Read more

परप्रांतीय मजुरांनी पुन्हा धरली महाराष्ट्राची वाट; रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल

मुंबई । लॉकडाउनकडून देशातील जनजीवन हळूहळू अनलॉक होण्याच्या दिशेने जात असताना आपल्या घरी परतलेले बिहार, उत्तर प्रदेशातील परप्रांतीय मजूर पुन्हा महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केल्यानंतर अनेक व्यवसाय, उद्योगधंदे पुन्हा सुरु झाले आहेत. प्रसंगी पायी चालत शेकडो किलोमीटर घरी पोहोचलेले तसंच श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून गेलेले अनेक मजूर, कामगार रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने … Read more

परप्रांतीय मजूर हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

मुंबई । पुन:श्च हरी ओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातला लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर बंद झालेले व्यवसाय आणि उद्योग पुन्हा सुरू झाले. उद्योग सुरू झाल्यामुळे आता परराज्यातले मजूर पुन्हा महाराष्ट्रात परतायला सुरुवात झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड व राज्याच्या … Read more

‘भाजपने व्हर्च्युअल रॅलीसाठी १५० कोटी खर्च केले, हेच पैसे मजुरांसाठी वापरता आले नसते का?’

रांची । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे इतर बडे नेते सध्या पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहे. या व्हर्च्युअल रॅलीच्या आयोजनासाठी तब्बल १५० कोटींचा खर्च आला असेल. हेच पैसे देशभरातील मजुरांना त्यांच्या गावी मोफत पोहोचवण्यासाठी वापरता आले नसते का, असा सवाल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी उपस्थित … Read more

लॉकडाऊनमध्ये मजुरांनी ‘पार्ले-जी’ बिस्किटांवर शमवली भूक; कंपनीनं विक्रीचा 82 वर्षांचा विक्रम मोडला!

मुंबई । लॉकडाऊनदरम्यान शहरातून गावाला जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी पार्ले-जी बिस्कीटं संजिवनी देणारी ठरली. लॉकडाऊन काळात आर्थिक संकटात सापडलेल्या मजुरांना परवडणाऱ्या पार्ले-जी बिस्किटांवरच आपली भूक शमवावी लागली. याचाच परिणाम म्हणून पार्ले-जीची एवढी विक्री झाली की मागील ८२ वर्षांचा विक्रम मोडला आहे. केवळ ५ रुपयांचा पार्ले-जी बिस्किटाचा पुडा शेकडो-हजारो किमी पायपीट करणाऱ्या मजुरांच्या भुकेला आधार होतं. काहींनी … Read more

‘या’ सरकारी योजनेअंतर्गत श्रमिकांना मिळणार वार्षिक ३६ हजार रुपये पेन्शन; अशी करा नोंदणी

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या संकटात सरकारकडून सध्या दोन प्रकारच्या योजना चालवल्या जात आहेत. आत्मनिर्भर भारत (Aatmnirbhar Bharat) आर्थिक पॅकेज आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजना. या दोन्ही योजनांमुळे सर्वसामान्य, गरीब आणि शेतकरी वर्गाला फायदा होणार आहे. सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी पेन्शन योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना, असं या योजनेचं नाव … Read more

स्थलांतरीत मजुरांना १५ दिवसात त्यांच्या गावी सोडा; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे देशातील विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांच्या मुद्द्यांवरून सुप्रीम कोर्टाने आज राज्यांना डेडलाइन दिली आहे. स्थलांतरीत मजुरांना १५ दिवसांत त्यांच्या गावी सोडा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्यांना दिले आहेत. स्थलांतरीत मजुरांसबंधीच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने राज्यांना आणखी हे निर्देश दिले आहेत. देशातील विविध ठिकाणी अडकलेल्यासर्व स्थलांतरीत मजुरांना आपल्या गावी सोडण्यासाठी राज्यांना … Read more

मजुरांनी कामावर परतावं म्हणून बिल्डरनं केली थेट विमान तिकिटांची सोय

हैद्राबाद । देशात कोरोना लॉकडाऊनमध्ये शिथिलतात दिल्यांनतर आता अनेक राज्यांतील आपल्या घरी परतलेल्या श्रमिकांना परत बोलावण्याचं मोठं आव्हान आता उद्योग जगतासमोर उभं आहे. यात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड राज्यातील मजुरांची संख्या अधिक आहे. दरम्यान, हैदराबादमधल्या एका बिल्डरनं मजुरांना कामावर परत आणण्यासाठी एक कमालीची शक्कल लढवली आहे. या बिल्डरनं आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या मजुरांना … Read more