Agniveer Reservation | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! केंद्रीय सुरक्षा दलामध्ये माजी अग्निवीरांना वय आणि शारीरिक चाचणीत सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agniveer Reservation | सरकारने अनेक विविध योजना आणलेल्या आहेत. यातीलच केंद्र सरकारची अग्नीवीर योजना ही सध्या चर्चेत आहे. परंतु या योजनेवरून मोठा वाद चालू झालेला दिसत आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील नेते देखील सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. अशातच आता केंद्र सरकारने माजी अग्निरांसाठी (Agniveer Reservation) केंद्रीय सुरक्षा दलामध्ये आरक्षणाची मोठी घोषणा केलेली आहे. याबद्दल आज म्हणजे 24 जुलै रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद लेखी उत्तरात सांगितलेले आहे की, “केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल जनरल ड्युटी रायफलमन पदाच्या भरतीमध्ये माजी अग्निरांसाठी 10टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच अग्निविर जमानांना वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीत देखील सूट देण्यात आलेली आहे.”

या अग्नीवीर योजनेअंतर्गत भारतात लष्कर आणि नौदल त्याचप्रमाणे हवाई दलात सैनिकांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाते. यात सशस्त्र दलातील नियुक्ती ही एक नवीन श्रेणी तयार करण्यात आलेली आहे. या अंतर्गत आता 35 75 टक्के अग्नीवीर (Agniveer Reservation) 4 वर्षाच्या सेवेनंतर कोणत्याही पेन्शन लाभाशिवाय निवृत्त होतात त्याचप्रमाणे उरलेले 25 टक्के अग्नीवीर हे नियमित सैनिक म्हणून दलामध्ये सामील होतात. परंतु आता या योजनेवरून विरोधक चांगलेच भडकलेले आहे. आणि सातत्याने ते सरकारवर टीका करताना दिसत आहे. त्यामुळे आता सरकारने उरलेले 75 टक्के अग्नीवीरांच्या रोजगारांची देखील व्यवस्था केलेली आहे.

यामुळे आता गृहराज्यमंत्री आणि आसाम रायफल्समधील रिक्त पदांची देखील माहिती दिलेली आहे. यावेळी ते म्हणाले की, “सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये एक जुलै 2024 पर्यंत रिक्त जागांची संख्या ही 8416 एवढी असणार आहे. एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत 67 हजार 345 एवढ्या उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. त्याप्रमाणे 64 हजार 91 रिक्त पदे अधिसूचित करण्यात आलेली आहे. ही पदे भरतीच्या विविध टप्प्यात आहेत.” अशी माहिती त्यांनी राज्यसभेत दिलेली आहे.