हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात श्रीमंत लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल) 2022 मध्ये 2 संघांची भर पडली असून एकूण 10 संघ असतील.
काही दिवसापूर्वी बीसीसीआयने आयपीएल मधील नवे संघ विकत घेण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार २२ कंपन्यांनी यासंदर्भात बोली लावली होती. अखेर आयपीएल मध्ये अहमदाबाद आणि लखनौ अशा दोन नव्या संघाची ऍन्ट्री झाली
संजीव गोयंका यांच्या मालकीच्या आरपीएसजी ग्रुपने सर्वाधिक 7090 कोटी रुपयांची बोली लावून लखनऊ फ्रँचायझी खरेदी केली आहे. यासह सीव्हीसी कॅपिटल्स ग्रुपने अहमदाबाद फ्रँचायझी 5625 कोटींना खरेदी केली आहे. बीसीसीआयला दोन नवीन आयपीएल संघांकडून सुमारे 7 ते 10 हजार कोटींची कमाई अपेक्षित होती, परंतु ही कमाई 12 हजार कोटींच्या पुढे गेली आहे.
Ahmedabad and Lucknow to be the two new teams at Indian Premier League (IPL). CVC Capital Partners gets Ahmedabad while RPSG Group gets Lucknow. pic.twitter.com/0zmQS7nQEb
— ANI (@ANI) October 25, 2021
दरम्यान, या संघांच्या समावेशानंतर आयपीएलमधील संघांची संख्या पुढील हंगामापासून 10 होईल. आयपीएलमधील सामन्यांची संख्याही 60 वरून 74 होईल. खेळाडूंच्या बाबतीत बोलायचे झाले तर दोन संघ वाढल्याने किमान ४५ ते ५० नवीन खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये 30 ते 35 तरुण भारतीय खेळाडू असतील.