हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा जाहीर झाल्या असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आता ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) ने सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी आपले ३ उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथून पुन्हा एकदा खासदार इम्तियाझ जलील याना तिकीट देण्यात आला आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना ओवेसी म्हणाले की, औरंगाबादमधून इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) लोकसभेचे उमेदवार असतील, बिहारचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान हे किशनगंजमधून निवडणूक लढवतील. तर आपण स्वतः हैदराबादमधून निवडणूक लढवणार आहोत असं असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितलं. आम्ही अजून काही जागा लढवणार असून बिहार, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील आणखी उमेदवारांची नावे सुद्धा लवकरच जाहीर करू. बिहारमधील AIMIM 11 जागांवर आपले उमेदवार उभे करू शकते. तर उत्तर प्रदेशातही आपलं नशीब अजमावण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल.
औरंगाबाद से @imtiaz_jaleel, किशनगंज से @Akhtaruliman5 चुनाव लड़ेंगे और हैदराबाद से इंशाअल्लाह पार्टी मुझे टिकट देगीpic.twitter.com/aPFUb0gZBy
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) March 18, 2024
महाराष्ट्रात MIM ६ जागा लढवणार-
दरम्यान, महाराष्ट्रात MIM ६ जागा लढवणार आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली होती. यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड.. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, विदर्भातील अकोला आणि आणखी एका मतदारसंघाचा आणि मुंबईतील एका जागेचा समावेश आहे. आम्ही यापेक्षा जास्त जागा सुद्धा लढू शकतो, मात्र सध्या तरी या जागा निश्चित झाल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितलं. आत्तापर्यंत इतिहास बघितला तर
MIM च्या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीलाचा तोटा झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा MIM मुळे महाविकास आघाडीलाच फटका बसण्याची आणि भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.