पुण्यात एअर होस्टेस तरुणीवर मित्राने केला बलात्कार; Tinder अ‍ॅपवरून झाली होती ओळख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पुण्यातून (pune) महिला अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील हिंजवडी परिसरात मित्राने एका  26 वर्षीय तरुणीवर बलात्कार (air hostess raped) केल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अभिजीत असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो काळेवाडीतील तापकीर नगर चौकात राहतो.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणी एका नामांकित एअरलाईन्समधील एअर होस्टेस आहे. टिंडर या ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. या मैत्रीचा गैरफायदा घेऊन त्याने तरुणीला शनिवारी दुपारी हिंजवडी येथील एका हॉटेलवर नेले. तिथे तिला जबरदस्ती दारू पाजली. आरोपीने तिला त्याच्या घरी नेले. तिथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

मित्राच्या या कृत्याने हादरलेल्या तरुणीने त्याला विरोध केला. त्यावरून आरोपीने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला, असेही तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने हिंजवडी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला अटक केली. या घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’