हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । (Air India Flight Crash) गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एअर इंडियाचे प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानी मध्ये कोसळलं आहे. घटनास्थळी प्रचंड प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळतायत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. एअर ऍम्ब्युलन्स दाखल झाल्या आहेत. धूर आटोक्यात आणण्याचे आणि प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. विमानात नेमके किती प्रवासी होते याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही.
VIDEO | Ahmedabad: Smoke seen emanating from airport premises. More details are awaited.
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7)
(Source: Third Party) pic.twitter.com/qbO486KoEo
विमानात जवळपास २४२ प्रवासी- Air India Flight Cras
माहितीनुसार, सदर विमानाचे नाव एअर इंडिया १७१ असं होते. हे विमान सरदार वल्लभभाई पटेल विमानतळातून लंडनला जात होते, मात्र टेक ऑफ दरम्यानच ते कोसळलं. या विमानात जवळपास २४२ प्रवासी असल्याचं बोललं जातंय. विमान लंडनच्या दिशेने जात होते, मात्र टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या १० मिनिटातच ते मेघानीनगर येथे कोसळलं. मेघानीनगर हे विमानतळापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. या दुर्घनेमुळे परिसरात धुराचे लोट बघायला मिळाले. अहमदाबाद अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाने आपल्या गाड्या घटनास्थळी दाखल पाठवल्या आहेत. हा अपघात कशामुळे झाला? विमानातील यंत्रणा कमी पडली कि अजून कोणती कारणे या अपघातामागे आहेत याचा शोध सुरु आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
विमानाच्या पाठीमागचा भाग हा झाडाला अडकला आणि त्यामुळे हे विमान कोसळलं असं बोललं जातंय. घटनास्थळी तुकड्यांचे अवशेष सापडलेत, यावरूनच हा अपघात किती भीषण होता ते समजतंय. देशातील हा सर्वात मोठा विमान अपघात असेही आपण म्हणू शकतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या विमान अपघातानंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना तातडीने फोन करून संवाद साधला आणि अपघाताबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली.




