हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Air India Plane Crash । गुजरातमध्ये आज धक्कादायक विमान अपघात घडला. लंडनला जाणारे एअर इंडिया एआय १७१ विमान अहमदाबाद येथील मेघानीनगर येथे कोसळलं. या विमानाने सरदार वल्लभभाई पटेल विमानतळातून टेक ऑफ केलं होतं, मात्र टेक ऑफ नंतर अवघ्या १५ मिनिटात ते कोसळलं. विमानात तब्बल २४२ प्रवासी प्रवास करत होते. हा विमान अपघात नेमका कसा झाला? याबाबतच तपास सुरु असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने Mayday!! Mayday!! Mayday असा संदेश जवळच्या एटीसीला दिला होता. मात्र तोपर्यंतच हे कोसळलं. परंतु Mayday या शब्दाचा अर्थ काय आहे? हा सिग्नल कधी वापरतात? ते जाणून घेऊया….
Mayday म्हणजे काय? Air India Plane Crash
तर मित्रानो, MAYDAY’ हा शब्द फ्रेंच शब्द “माएडर” पासून आला आहे, ज्याचा अर्थ मला मदत करा. मेडे हा शब्द डिस्ट्रेस कॉलमध्ये वापरला जातो. याचा अर्थ विमान आणि प्रवाशांचे जीव धोक्यात आहेत. अशा परिस्थितीत, त्या विमानाला आपत्कालीन मदतीची आवश्यकता असते. म्हणून, आपत्कालीन परिस्थितीत पायलटला मेडे हा शब्द बोलण्यास सांगितले जाते. आपत्कालीन परिस्थितीत, रेडिओ हस्तक्षेप आणि मोठ्या आवाजामुळे, पायलटना हा शब्द तीन वेळा पुन्हा सांगण्यास सांगितले जाते. जर पायलटने आपत्कालीन परिस्थितीत स्पष्ट सांगितले की उड्डाणात समस्या आहे, तर विमानात गोंधळ होण्याची शक्यता असते आणि प्रवासी सुद्धा घाबरू शकतात. म्हणूनच, आपत्कालीन परिस्थितीत पायलटला नेहमीच MAYDAY म्हणण्यास सांगितले जाते. MAYDAY कॉल देताच, नियंत्रण कक्ष त्या विमानाला प्राधान्य देतो आणि त्याला मदत करण्यासाठी सर्व संसाधने वापरतो, जसं की, आपत्कालीन लँडिंगची परवानगी, विमानाच्या एमर्जंन्सीसाठी धावपट्टी रिकामी करणं, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तयार ठेवणं.
VIDEO | Ahmedabad: Smoke seen emanating from airport premises. More details are awaited.
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7)
(Source: Third Party) pic.twitter.com/qbO486KoEo
दरम्यान, अहमदाबाद विमान अपघात हा देशातील मोठा अपघात म्हणावा लागेल. या विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल चालवत होते, तर त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते. सुमित सभरवालला 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर क्लाईव्हला 1100 उड्डाण तासांचा अनुभव होता. मात्र उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत हे विमान थेट एका इमारतीवर आदळलं (Air India Plane Crash) . संपूर्ण देशासाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला आहे.




