औरंगाबाद | कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊनमुळे एअर इंडियाच्या सर्व विमानसेवा आठवड्यातून पाच दिवस बंद करण्यात आल्या होत्या. आता एअर इंडियाची दिल्ली आणि मुंबई विमानसेवा दररोज उड्डाण घेणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्ली, मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवाशांच्या सुविधेची मोठी भर पडली आहे. कोरोना च्या काळातही आठवड्यातून पाच दिवस येईल याची मुंबई- औरंगाबाद-दिल्ली आणि दिल्ली-औरंगाबाद मुंबई विमानसेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होती.
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने आता विमान प्रवाशांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस उडान घेणार असल्याचे समजत आहे.




