हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आपण देखील कधीतरी विमानाने प्रवास (Air Travel) करावा अशी अनेकांची इच्छा असते. परंतु विमानाचे तिकीटच (Flight Ticket) एवढे महाग असते की ही इच्छा पूर्ण करणे प्रत्येक व्यक्तीला शक्य होत नाही. सर्वसामान्य प्रवाशालाही विमानाचे तिकीट काढण्यासाठी 6 ते 7 हजार रुपये मोजावे लागतात. मात्र, भारतातील असे एक राज्य आहे जिथे विमानाचे तिकीट काढण्यासाठी फक्त 150 रुपये भरावे लागतात. त्यामुळे कोणताही सामान्य नागरिक विमानाने प्रवास करू शकतो.
ही आहे खास योजना
विमानाने प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना आम्ही सांगू इच्छितो की, केंद्र सरकारकडून उड्डाण ही योजना सर्वसामान्यांसाठी राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत विमान कंपनी अलायंस एयर फक्त 150 रुपयांपर्यंत विमानाचे तिकीट देत आहे. फक्त 150 रुपये तिकीट असलेले हे विमान तेजपुर ते लखीमपुरमधील लीलाबरी एअरपोर्ट दरम्यान ऑपरेट होत असते. सध्या याच विमानाचे तिकीट 150 रुपये असल्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांची लगबग सुरू आहे.
तेजपूर ते लीलाबरी येथे गाडी करून गेल्यास 216 किमी अंतर पार करण्यासाठी 4 तासांचा वेळ जातो. परंतु याच ठिकाणी पोहोचण्यासाठी हवाई मार्गाचा वापर केल्यास फक्त 25 मिनिटे लागतात. त्यामुळे कंपनी या प्रवासासाठी 150 रुपये तिकीट आकारते. महत्वाचे म्हणजे, जेव्हापासून या मार्गावर विमान प्रवास सुरू झाला आहे तेव्हापासून 95 टक्के तिकिट विकली जात आहेत. तसेच विमान प्रवाशांच्या संख्येत ही वाढ झाली आहे.
दरम्यान, 2017 पासून केंद्र सरकारकडून उड्डाण योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत अलायंस एयर, फ्लाईबिग, इंडिगो या विमान कंपन्या सर्वात स्वस्त तिकीट देत आहेत. तर या योजनेशी आसाम, मेघालय, नागालँड, अरुणाचल, सिक्किम असे देश जोडले गेले आहेत. ही योजना खास सर्वसामान्य नागरिकांना विमानाने प्रवास करता यावा यासाठी सुरू करण्यात आली आहे.