हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 5 ऑक्टोंबरपासून भारतात ICC क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी 2 स्पेशल प्लॅन्स लॉन्च केले आहेत. या दोन्ही प्लॅनमार्फत ग्राहक मनसोक्त डेटा युज करू शकतात. सध्या सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्डकपचे सामने पाहताना ग्राहकांना डेटाची कमतरता जाणवू नये, यासाठी एअरटेल कंपनीने 2 डेटा प्लॅन्स लॉन्च केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया एअरटेल Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी कोणते प्लॅन्स आणले आहेत.
99 रुपयांचा प्लॅन
Airtel कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 2 स्पेशल डेटा प्लॅन्स आणले आहेत. यातला पहिला प्लॅन एअरटेलने 99 रुपयाचा आणला आहे. 99 रुपयांच्या खास प्लॅनमध्ये तुम्हाला 2 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटाची सुविधा मिळत आहे. एकदा तुम्ही 99 रुपयांचा प्लॅन केला की, तुम्हाला दोन दिवस हवा तितका डेटा वापरता येऊ शकतो.
49 रुपयांचा प्लॅन
Airtel कंपनीने दुसरा प्लॅन 49 रुपयांचा आणला आहे. या प्लॅनमध्ये एका दिवसासाठी 6 GB डेटा ग्राहकांना वापरण्यासाठी मिळत आहे. या डेटामुळे तुम्हाला एखादा विशिष्ट क्रिकेट सामना दिवसभर पाहता येईल. तसेच दिवसभर अनलिमिटेड डेटा असल्याने तुम्ही कोणताही मूवी कोणताही सामना तुमच्या वेळेत पाहू शकता. यामुळे तुमचा त्वरीत डेटा देखील संपणार नाही.
दरम्यान, क्रिकेट वर्ल्ड कप सामन्यांच्यापूर्वी एअरटेल कंपनीने ग्राहकांसाठी Airtel DTH स्पेशल रिचार्ज सादर केले आहेत. यासाठी एअरटेल स्टार नेटवर्कशीही सहकार्य करत आहे. सध्या एअरटेल Xstream Box वर क्विक-एक्सेस प्रोमो-रेल चालवत आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या भाषेत क्रिकेट मॅच पाहता येऊ शकते. असे वेगवेगळ्या प्लान्स एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आणले आहेत.