Airtel ने लाँच केला जबरदस्त प्लॅन !!! 149 रुपयांमध्ये मिळणार अनेक फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल टेलिकॉम कंपन्या कमी किंमतींत जास्त फायदे असलेले प्लॅन ऑफर लाँच करत आहेत. अशातच आता Airtel ने ग्राहकांसाठी 149 रुपयांचा नवा प्लॅन आणला आहे. ज्या अंतर्गत अनेक OTT बेनिफिट्स देखील मिळतील. इथे हे जाणून घ्या कि, एअरटेकडे आधीच 148 रुपयांचा प्लॅन आहे, मात्र नवीन 149 रुपयांचा प्लॅन त्यापेक्षा वेगळा आहे. तसे पहिले तर हे दोन्ही फक्त डेटा पॅक आहेत. चला तर मग आज आपण 149 रुपयांच्या प्लॅनबाबतची माहिती जाणून घेऊयात.

Latest prepaid plan to suite your needs - Airtel

Airtel चा 149 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये फक्त 1GB डेटा मिळेल. या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी ग्राहकांच्या सध्याच्या पॅकएवढीच असेल. जर आपल्याकडे आधीच 30 दिवसांचा प्लॅन असेल तर त्याची व्हॅलिडिटी देखील 30 दिवसांसाठी राहील. या प्लॅनमध्ये 1GB डेटासहीत, ग्राहकांना 30 दिवसांसाठी Xstream प्रीमियमचा एक्सेस देखील मिळेल. Xstream Premium हा Airtel चे एकमेव असा प्‍लॅटफॉर्म आहे, जिथे ग्राहकांना एकाच App मध्‍ये 15 + OTT प्‍लॅटफॉर्मचा कंटेंट अ‍ॅक्सेस मिळतो.

Airtel Increases Base Plan Price In Seven Circles: Here's Why - MySmartPrice

या प्लॅनद्वारे जास्तीत जास्त लोकांना Xstream Premium कडे आणणे हा कंपनीचा यामागील उद्देश आहे. या प्लॅनमध्ये फक्त 1GB डेटाच मिळत असल्याने जास्त डेट पॅक लागणाऱ्या लोकांसाठी हा प्लॅन योग्य ठरणार नाही. एअरटेलच्या 149 रुपयांच्या प्लॅनचे सबस्क्रिप्शन घेऊन ग्राहकांना फक्त 30 दिवसांसाठी Xstream प्रीमियममधील एक्सेस सोबतच 1GB डेटा देखील मिळेल. जर आपल्याला फक्त डेटा प्लॅन घ्यायचा असेल तर आपण 148 रुपयांच्या प्लॅनकडे जाऊ शकता, कारण त्यामध्ये 15GB डेटा उपलब्ध आहे.

Bharti Airtel 30 Days Validity Prepaid Plans

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/bank/mobile-prepaid/airtel-online-recharge

हे पण वाचा :
बनवायची आहे आपल्या नावाची Ringtone, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
मोबाईलचे Charger फक्त दोनच रंगांचेच का असतात ??? जाणून घ्या यामागील कारणे
SBI Card कडून क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावरील प्रक्रिया शुल्कात वाढ, तपासा इतर बँकांचे चार्ज
Stock Market : येत्या काळात ‘या’ सेक्टर्समधील शेअर्स देऊ शकतील जबरदस्त रिटर्न
Gold Price Today : सोन्या-चांदी झाले स्वस्त, पहा आजचे नवीन दर