हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| Airtel कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत वेगवेगळ्या ऑफर्स लॉन्च करत असते. आता Airtel ने T20 वर्ल्ड कपच्या निमित्ताने एक खास प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये यूजर्सना Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाईल. त्यामुळे ज्या लोकांना क्रिकेट पाहिला आवडते त्या लोकांसाठी हा प्लॅन सर्वात फायदेशीर ठरेल. खास म्हणजे, या प्लॅनसाठी ग्राहकांना फक्त 499 रुपये मोजावे लागतील. ज्यात त्यांना 28 दिवसांसाठी दररोज 3GB हायस्पीड इंटरनेटचा सेवा मिळेल.
प्लॅनद्वारे T20 World Cup विनामूल्य पहा
Airtel च्या 499 च्या रिचार्ज प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी Disney Plus हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाईल. तसेच, या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेवर 20 हून अधिक OTT प्लॅटफॉर्म उपलब्ध असतील. ज्यावर तुम्ही तुमचे आवडते शो, चित्रपट आणि वेब सिरीज पाहू शकाल. या प्लॅन मुळे क्रिकेटप्रेमींना T20 World Cup चे सामने कोणत्याही अडथळ्याशिवाय पाहता येणार आहेत. या प्लॅनमुळे तुम्ही Disney+ Hotstar वर T20 World Cup विनामूल्य पाहू शकाल.
खास म्हणजे, जर तुम्हाला या प्लॅनचा फायदा अधिक काळासाठी घ्यायचा असेल तर तुम्हाला 839 रुपये किंवा 3,359 रुपयांचा रिचार्ज प्लॅन करावा लागेल. 839 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळेल. यासह दररोज 2GB डेटा मिळेल. तसेच 3,359 रुपयांच्या प्लॅनमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार विनामूल्य पाहता येईल. यासह Xstream ॲपवर OTT चाही आनंद घेता येईल. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा दिला जाईल. त्यामुळे हे तिन्ही प्लॅन तुम्हाला फायदेशीर ठरतील.