Airtel Price Hike : Airtel च्या ग्राहकांना पुन्हा बसणार धक्का, प्रीपेड प्लॅन्स आणखी महागणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel Price Hike : गेल्या वर्षी अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या होत्या. यामध्ये BSNL वगळता जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी (विशेषतः Jio, Airtel आणि Vi) ने आपल्या प्रीपेड सर्व्हिसेसच्या किंमती वाढवल्या आहेत. आता लवकरच एअरटेलच्या ग्राहकांना देखील आणखी एक झटका बसणार आहे. कारण आता एअरटेल पुन्हा एकदा आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवणार आहे.

ET च्या रिपोर्ट्सनुसार, 5G च्या बेस प्राइसबाबत टेलिकॉम कंपन्या नाखूष आहेत. याबाबत कंपनीचे सीईओ गोपाल विट्टल यांनी सांगितले की,” 2022 मध्ये एअरटेल आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवू शकते. कारण 5G साठी टेलिकॉम रेग्युलेटरने निश्चित केलेल्या बेस प्राइसबाबत Airtel खूश नाही. यावेळी कंपनीचा एव्हरेज रेव्हेन्यू पर यूझवर म्हणजेच ARPU चे 200 रुपये टार्गेट असेल. विट्टल असेही म्हणाले कि, “या इंडस्ट्रीला किंमतीत तीव्र घट अपेक्षित आहे, जरी ती कमी झाली असली तरी ती पुरेशी नाही आणि या बाबतीत कंपनी निराश झाली आहे.” Airtel Price Hike

Airtel Prepaid Plans Get Price Hike: All You Need To Know

हे लक्षात घ्या कि, गेल्या वर्षी, तिन्ही मोठ्या टेलिकॉम ऑपरेटर्सनी आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती 18-25 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. गोपाल विट्टल पुढे म्हणाले की, “मला असे वाटते की, आम्हाला या वर्षभरात दरवाढ दिसायला हवी. मात्र या स्तरावर असलेली दरवाढ अजूनही खूपच कमी आहे. आधी पोर्ट करण्यासाठी 200 रुपये लागतात आणि त्यासाठी एकदा तरी दर वाढवावा लागेल.” हा धक्का ग्राहक सहन करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. Airtel Price Hike

TRAI Data Shows Airtel Led APRU During June-September FY21 - Gizbot News

इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे कि, गेल्या वर्षीच्या दरवाढीनंतरही गेल्या तीन महिन्यांत Airtel च्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी देखील Airtel ने आपल्या दरात वाढ केली होती.

Airtel to Acquire Vodafone's 4.7% Stake in Indus Towers if Funds Are Used for VIL | The Indian Nation

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/recharge-online

हे पण वाचा :

Airtel च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनमध्ये मिळत आहे Amazon Prime चे Free सब्सक्रिप्शन

Airtel Netflix : फ्री मध्ये Netflix वापरण्यासाठी Airtel चे ‘हे’ खास प्लॅन

BSNL चा धमाकेदार प्लॅन : Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे

Airtel चा नवा प्लॅन : Netflix वर मोफत पहायला मिळणार मनसोक्तपणे Movies – Web Series

Leave a Comment