Airtel च्या 200 रुपयांपेक्षा कमी प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा 2GB डेटा

Airtel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Airtel कडून 19 रुपयांच्या सर्वात स्वस्त प्लॅनची ऑफर दिली जात आहे, ज्यामध्ये अनलिमिटिड कॉलिंगची सुविधा मिळते. मात्र, त्याची व्हॅलिडिटी फक्त 2 दिवसांचीच असेल. जर आपल्यालाही कमी किंमतीत एका महिन्याची व्हॅलिडिटी असलेला आणि इंटरनेट तसेच कॉम्प्लिमेंट्री बेनिफिट देणारा प्लॅन हवा असेल तर ही बातमी नक्की वाचा. आज आपण एअरटेलच्या अशाच स्वस्त प्लॅनबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा बेनिफिट देखील मिळतो.

Recharge with these best prepaid plans for validity from Airtel

Airtel च्या या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यामध्ये 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत एका महिन्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग तसेच 2GB हाय स्पीड इंटरनेट डेटा दिला जातो. मात्र हा 2GB डेटा लिमिट संपल्यानंतर 50p/MB पैसे द्यावे लागतील. यासोबतच 300 फ्री एसएमएस देखील मिळतात. मात्र या 300 एसएमएस संपल्यानंतर स्थानिक मेसेजेससाठी रुपये 1 प्रति एसएमएस आणि एसटीडी मेसेजेससाठी प्रति एसएमएस 1.5 रुपये मोजावे लागतील.

Airtel's latest prepaid plan offerings to suit your recharging needs

या प्लॅनमध्ये Airtel कडून फ्री हॅलो ट्यून्सची सुविधा देखील मिळते. याद्वारे कोणत्याही गाण्याला फोनची हॅलो ट्यून म्हणून वापरता येईल. यामध्ये Wynk Music Free सब्सक्रिप्शन देखील दिले जाते. याद्वारे म्युझिक, हॅलोट्यून्स, लाइव्ह कॉन्सर्ट आणि पॉडकास्टचा आनंदही घेता येईल.

Bharti Airtel Most Affordable Year Long Validity Prepaid Plan

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/bank/mobile-prepaid/airtel-online-recharge

हे पण वाचा :

‘या’ प्लॅनअंतर्गत Vodafone Idea कडून दिला जात आहे 75GB पर्यंत अतिरिक्त डेटा !!!

Credit Card वर EMI करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी लक्षात घ्या !!!

Personal Loan साठी अर्ज करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा !!!

‘या’ Multibagger Stock ने गेल्या 1 वर्षात गुंतवणूकदारांवर पडला पैशांचा पाऊस !!!

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी सोबत मिळवा डेली 2GB डेटा