लढा कोरोनाशी | कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी कोरोनाविरुद्ध लढण्याकरता देशात २१ दिवसांचे लाॅकडाउन जाहिर केलेय. लाॅकडाउनमुलके सर्व कारखाने, छोटे-मोठे उद्योग बंद आहेत. यामुळे तळहातावर पोट असणार्या कामगारांवर खूप मोठा परिणाम पडला आहे. एक वेळच्या जेवण मिळवणंही या कामगारांना कठिण झालंय.
दूर कुठे चीन देशात जन्माला आलेल्या कोरोना व्हायरसने या कामगारांवर उपासमारीची वेळ आणली आहे. कोरोनामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी शासनाने खास विमाने पाठवली मात्र देशातच इतर राज्यांत, शहरांत अडकलेल्या कामगार वर्गाला आपल्या गावाकडे जाण्यासाठी कोणती व्यवस्था केली नाही. हाताला काम नसल्याने खिशात पैसे नाहीत आणि गावाकडे जावे तर पोलिसांचा मार घावा लागत असल्याने इकडे आड तर तिकडे विहीर अशी अवस्था या कामगारांची झाली आहे.
दरम्यान, दिल्लीतील काही कामगारांवर क्लोरिन वाॅटर स्प्रे मारुन त्यांना धुतल्याने या कृत्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. या सर्व घटनांवर ऐश्वर्या रेवडकर यांनी एक कविता तयार केली आहे. आ तमाशा देख या कवितेतून त्यांनी परिस्थिती मांडली आहे.
आ, तमाशा देख.
क्लोरिन वोटर स्प्रे से धुलवाओ सालो को
ये लोग जो सहरो का कचरा उठाते है, सडको पे सोया करते है
न जाने कहा कहा से, कौन से गन्दी बस्तियों से उठ आये है..
निकल पड़े है फैलाने इनसे लिपटी
न जाने कितनी पिढ़ियो की बरसो पुरानी गंदगी.
क्या बोल रहे हो ?
भूख लगी है ? प्यासे हो ? घर जाना है ?
ये लो.. नंगे बदन पे डंडे खाओ.
अगर करते हो हिम्मत खुद से खड़े होने की
तो कुचले दिए जाओगे महासत्ता के बलशाली पैरो तले
लोकतंत्र का महायज्ञ है चल रहा,
इसमें आहुति चढने की भी काबिलियत नहीं तुम्हारी
पूंजीवाद के महारथ के पैय्योतले जगह तुम्हारी
शहरो की गन्दगी साफ़ करते हुए
घिस घिस कर मर जाने की औकात तुम्हारी
और मुह से आह तक नहीं निकालो !!
हाँ. मुह से आह तक नहीं निकालो !!
क्या तुम इन्सान हो ? क्या हम इन्सान है ?
तुम हो कीड़े सहर के नाली के,
हम है सत्तावान मदमस्त हैवान !!
और ये बन बैठे है पत्थर के बुत
चुपचाप तमाशा देखने वाले इन्सान.
ऐश्वर्या रेवडकर