मुंबई | भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि बी.सी.सी.आय. चे माजी अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा घेतली. या भेटी मधे दोघांमधे कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अजून समजलेले नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आॅफिशीअल ट्विटर वरुन ही सदिच्छ भेट असल्याचे सांगण्यात आले आहे.
शरद पवार आणि अजिंक्य रहाणे यांचा जुना स्नेह असून रहाणे ज्यावेळी रणजी करता खेळत होता त्याच काळात पवार मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष होते. पवार पुढे आयसीसीआय चे आणि बीसीसीअाय चे अध्यक्ष झाले. त्याच काळात रहाणे यानेही क्रिकेट मधे चांगली कामगिरी करत भारतीय संघात नाव कमावले.
भारतीय क्रिकेट संघाचे उपकर्णधार @ajinkyarahane88 यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. @PawarSpeaks यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/OColQsqclH
— NCP (@NCPspeaks) August 14, 2018