शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले जाणार तर..!! राज्यातील शेतकऱ्यांसाठी अजितदादांच्या मोठ्या घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महायुती सरकारचे शेवटचे पावसाळी (Mansoon Session) अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. आज म्हणजेच 28 जून रोजी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024-25) सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी देखील मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणा नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया.

  • कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप 2023-24 2 हेक्टर मर्यादेत 5 हजार रुपये दिले जाणार.
  • गाईच्या दुधासाठी 1 जुलैपासून प्रतिलिटर 5 रुपये अनुदान सरकारकडून देण्यात येईल.
  • शेतमालाच्या पंचनामासाठी राज्यभरात ही पंचनामा पद्धत राबवली जाणार.
  • शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय.
  • राज्यातील 8 लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप दिले जाणार.
  • जलयुक्त शिवारासाठी 650 कोटींची तरतूद केली जाईल.
  • शेतकऱ्यांना बांबूंची रोपे मोफत दिली जाणार.
  • राज्यात गाव तिथे गोदाम ही योजना राबवली जाणार.
  • सरकारकडून राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.
  • शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा देण्याची योजना सुरू राहील.
  • राज्यातील 108 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता.