भाऊबीजेलाही लाडक्या बहिणींना मिळणार ओवाळणी; अजित दादांना केला हा वादा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता सध्या राज्यामध्ये राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. राज्य सरकारने दोन महिन्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यभरातील महिलांना दीड हजार रुपये दर महिना दिले जातात. परंतु ही योजना केवळ निवडणूक पुढील पाच वर्षे चालणार आहे. असा विश्वासही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांनी दिलेला आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसामान्य याच्या माध्यमातून राज्याचा दौरा आखला असून ते सध्या मराठवाड्यामध्ये आहे यावेळी बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची संवाद साधताना दिसले. यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे. परंतु आता ही ओवाळणी कशा स्वरूपात मिळणार आहे हे आपण जाणून घेऊया.

सरकारचे लाडके बहिण योजनेचे तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळालेला आहे .राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या सणाच्या अगोदर महिलांच्या खात्यात लाडके बहिण योजनेच्या दोन हप्त्यांचे पैसे जमा केले होते. त्यात आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. परंतु दिवाळीला भाऊबीजेच्या दिवशी देखील महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “राज्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्या त्या ठिकाणी मी जनसमान यात्रा घेऊन जात आहे. विरोधक टीका करतात पण आमच्या अंगाला काही भोके पडत नाही. या सत्तेत असताना कोणते योजना आणली. मात्र आता माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणलेली आहे. त्यामुळे त्यांच्या हक्काचे पैसे ते कधीही काढू शकतात. आणि वापरू शकतात. आम्ही दिलेल्या ही योजना पाच वर्षे चालण्यासाठी तुम्ही घड्याळ या चिन्हाला मतदान करावे लागेल. मी बोलतो तसा वागतो हा अजित दादांचा वादा आहे ज्याप्रमाणे मी रक्षाबंधनाला तीन हजार रुपये दिले तसे भाऊबीजला देखील मी माझ्या बहिणींना खाली हाताने पाठवणार नाही. ओवाळणी देणार म्हणजे देणार हा माझा वादा आहे. म्हणजेच आता भाऊबीजेलाही ओवाळणी मिळणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिलेली आहे.

सध्या अजित पवार हे महाराष्ट्र सन्मान यात्रा करत आहे. या निमित्ताने ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत. तेथील बहिणींशी आणि इतर नागरिकांशी संवाद साधत आहे. आणि त्यांच्या पक्षाचा प्रचार देखील करत आहेत विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांसारख्या योजना आणताना दिसत आहेत.