अजित पवार जेव्हा टपरीवर थांबून पान घेतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार आपल्या हटके अंदाजाने नेहमीच चर्चेत असतात. रोखठोक बोलणे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी जवळीक अशी ओळख असलेल्या पवार यांचा असाच हटके अंदाज शुक्रवारी पहायला मिळाला. गाडीतून प्रवास करत असताना त्यांना अचानक पान खाण्याचा मोह झाला आणि ते रस्त्यालगतच्या पान टपरीवर थांबले.

बारामती येथील पणदरे पान स्टाॅल वर अजित पवारांनी आपली गाडी उभी केली आणि पानाचा अास्वाद घेतला. यावेळी पवार यांनी पान विक्रेत्याशी संवाद साधला. दिवसभरात किती रुपांचा धंदा होतो, कोणकोणती पानं मिळतात असे प्रश्न पवार यांनी विचारले.

सध्या देशभर निवडणुकांचे वारे वाहू लागले असून सर्वच पक्षांचे नेते प्रचार सभा आणि मेळाव्यांमधे मग्न आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या कानाकोपर्‍यात जाऊन परिवर्तन सभेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. अशा व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून पवार यांनी पान टपरीवर थांबून पान खाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत एकच चर्चा रंगली आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

आणि राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा ढाब्यावर थांबला…

नवनीत राणा अमरावतीतून लोकसभा लढवण्यास इच्छुक ? पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधान

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

आधी लोकसभा निवडणूक जिंका, नंतर पंतप्रधान शोधा – शरद पवार

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

Leave a Comment