उतार वयात कंटाळा आला तर भजन करायचं; अजितदादांचा शरद पवारांना टोला

ajit pawar sharad pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड केल्यानंतर पवार कुटुंबियांत सुद्धा मोठी फूट पडली आहे. त्यातच सध्या लोकसभा निवडणुकीचं वार असून बारामतीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवारांकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पवार पायाला भिंगरी लावून बारामती मतदारसंघ पिंजून काढत आहेत, जाहीर सभा घेत आहेत. याच दरम्यान, एका सभेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) जिव्हारी लागणारी टीका केली आहे. उतार वयात कंटाळा आला तर भजन करायचं असतं असं म्हणत अजितदादांनी नाव न घेता शरद पवारांना टोला लगावला आहे. (Ajit Pawar Target Sharad Pawar)

बारामतीमधील सभेमध्ये अजित पवार यांनी थेट शरद पवारांवर टीका केली. उतार वयातील लोकांनी आशिर्वाद देण्याचं काम करायचं असतं. चुकलं तर कान धरायचा असतो. फारच काही कंटाळा आला तर भजन करायचं असतं,” असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावरून टोला लगावला. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा आपल्या भाषणातून अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावरून सवाल केला आहे. वरिष्ठानी आता थांबावं, युवकांच्या हातात नेतृत्व द्याव असं अजित पवार म्हणाले होते, आता पुन्हा एकदा वयावरून भाष्य केल्यानंतर शरद पवार यावर काय उत्तर देतात हे आता पाहायला हवं .

दरम्यान, बारामतीत अजित पवारांनी भर सभेत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची मिमिक्री करत टीका केली. अनेक जणांना फोन येत आहेत. अनेकांना भावनिक आवाहन केलं जात आहे. १५ वर्ष ज्यांना फोन केला नाही त्यांनाही फोन येतील, तुम्हाला विचारलं जाईल, असे कसा आहेस? काय मदत लागली तर सांग .. मला येऊन भेट.. पण मग इतक्या वर्ष काय करत होतात असा सवाल अजित पवारांनी केला. तसेच संसदेत भाषणे करून काय होत नाही, त्यासाठी निधीही आणावा लागतो असं म्हणत सुप्रिया सुळेंवर अजित पवारांनी हल्लाबोल केला.