अजितदादांचे 6 आमदार जयंत पाटलांना भेटले; घरवापसीच्या चर्चांना उधाण

ajit pawar and jayant patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी घटना घडली आहे. आज अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) 6 आमदारांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) याची एका बंद खोलीत भेट घेतली आहे. यामुळेच अजित पवार गटात गेलेले 18 ते 19 आमदार पुन्हा शरद पवार गटात परत येतील, अशा चर्चांना उधाण आले आहे.

खरे तर, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला चांगली यश मिळाल्यामुळे अजित पवारांबरोबर गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांच्या आश्रयाला येतील असे म्हटले जात आहे. मधल्या काळा त रोहित पवार आणि जयंत पाटलांनी देखील दावा केला होता की, अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. तर दोन दिवसांपूर्वीच पक्षाचे हित जपणाऱ्या आमदारांना पुन्हा पक्षात घेतले जाईल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

या सर्व घडामोडींमध्येच आज आणखीन एक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील 6 आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे व अनिल देशमुख ही उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. यासह, यातील दोन आमदार हे नाशिक भागातील असल्याचे ही सांगितले जात आहे. परंतु याबाबत कोणतेही ठोस माहिती समोर आलेली नाही. परंतु सध्या या बातमीमुळे राजकिय चर्चांचा जोर वाटला आहे.