नवीन पायंडे पाडू नका; पुणे पोलिसांच्या ‘त्या’ मास्टर प्लॅनवर अजितदादांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने अक्षरशः थैमान घातले आहे. कोयता गँगमुळे पुण्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसानी या गॅंगला पकडण्याबाबत थेट बक्षिसे जाहीर केली आहेत. मात्र अशा प्रकारे नवीन पायंडे पाडू नका असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, जर एखादा गुंड अजिबातच सापडत नसेल तर त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले जाते. वीरप्पन, चार्ल्स शोभराज सापडत नव्हते त्यावेळी अशा प्रकारचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र सरसकट बक्षीस जाहीर केले जात असेल तर पोलीस यंत्रणांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. त्यामुळे पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नये”, असे अजित पवार यांनी सांगितले. अशी क्षीस जाहीर केल्यानंतर एखादा पोलीस म्हणेल की एखाद्यावर बक्षीस लागेल तेव्हाच मी तपास करेन असंही त्यांनी म्हंटल.

पुणे पोलिसांनी जाहीर केलेली बक्षिसे नेमकी किती –

गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गॅंग कडून पुण्यात ठिकठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरामध्ये या गुंडांचा वाढत प्रभाव पाहता पोलिसांपुढे सुद्धा मोठं आव्हान उभं राहील आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गुंडांचा बंदोबस्त करणाऱ्या पोलिसाना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, कोयता गँगचा आरोपी पकडून दिल्यास ३ हजारांचं बक्षीस देण्यात येईल. बंदूक जवळ बाळगणाऱ्या आरोपीला 10 हजार बक्षीस असेल तर वॉन्टेड आणि फरार आरोपी पकडून दिल्यास त्यालाही 10 हजारांचं बक्षीस देण्यात येईल. मोक्का किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास 5 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.