अरं बाबा… तुला काही कोरोना होणार नाही पण तुझ्यामुळे दुसऱ्याला होईल त्याचं काय ? नाव न घेता अजितदादांचा राज ठाकरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना संकट वाढलं असून सरकारने मास्क वापरणे बंधनकारक केलं आहे. परंतु मी मास्क वापरत नाही, तुम्ही देखील वापरू नका अस विधान काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतला.

अजित पवार म्हणाले, ‘काही लोक तर सरळ म्हणतात मी मास्क घालणार नाही. अरं बाबा… तुला काही कोरोना होणार नाही. पण तुझ्यामुळे दुसऱ्याला होईल त्याचं काय ?’ अस म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे –

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेनं शाखा-शाखांवर ‘मराठीतून स्वाक्षरी’ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यापैकी एका कार्यक्रमात राज ठाकरे स्वत: सहभागी झाले होते. मात्र, त्यांनी मास्क लावले नव्हते. याबद्दल पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर, मी मास्क घालतच नाही. तुम्हालाही सांगतो,’ असं ते म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like