दादांच्या राष्ट्रवादीचे अरुणाचल प्रदेशात 3 आमदार विजयी, 2 थोडक्यात पडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh Assembly Election) आणि सिक्कीम विधानसभेचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP Ajit Pawar) मोठं यश मिळालं आहे. अजितपवारांचे ३ आमदार अरुणाचल प्रदेशातून निवडून आले आहेत तर २ उमेदवार अवघ्या २ आणि २०० मतांनी पडलेत. राष्ट्रवादी काँग्रेसने अरुणाचल विधानसभेच्या एकूण १५ जागा लढवल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अजित पवारांकडे गेल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राबाहेर पक्षाला यश मिळालं आहे.

१९ एप्रिलला अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या 60 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. आज याबाबत निकाल जाहीर करण्यात आले. एकूण 60 जागांपैकी १५ जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढवल्या होत्या. यातील ३ ठिकाणे त्यांचे आमदार निवडून आले. टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख कमिन असे या ३ उमेदवारांची नावे आहेत. तर अजित पवारांच्या ३ जागा अगदी थोडक्यात गेल्या. दादांचा एक उमेदवार दोन मतांनी पडला आहे तर दुसऱ्या उमेदवाराचा अवघ्या 200 मतांनी पराभव झाला. अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने १० टक्के मते मिळवली.

दरम्यान, अरुणाचल विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप सरकार आलं आहे. याठिकाणी भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ४६ जागा जिंकत आपली सत्ता राखली. मागील विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने 41 जागा जिंकल्या होत्या. आता तोच आकडा 47 वर आला आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशात भाजपची ताकद आणखी वाढली असं म्हणायला हवं. भाजपशिवाय नॅशनल पीपल्स पार्टी – 5, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 3, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल – 2, काँग्रेस – 1 आणि 3 अपक्ष निवडून आले.