राज्यात मोफत लसीकरणावर अजित पवारांचे सूचक वक्तव्य म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत कोरोना लसीकरण हे महत्वाचे मानले जात आहे. देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मोफत लसीकरण करणार का? यासंदर्भात सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले आहेत. सर्वांसाठी मोफत लसीकरणावर मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असे त्यांनी म्हंटले आहे.

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “सर्वांसाठी मोफत लसीकरणावर मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील मी विनामूल्य लसींच्या प्रस्तावावर सही केली आहे. मुख्यमंत्री लोकांच्या हिताचा निर्णय घेतील. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही लसींच्या खरेदीच्या जागतिक निविदेच्या मुद्द्यावर चर्चा करू” असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, ” केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात लसीचा तुटवडा आहे. ऑक्सीजन, रेमडीसीवीर आणि लसी वर केंद्राचा कंट्रोल आहे. त्यामुळे देशांच्या प्रमुखांना सांगितलं की त्यावर योग्य निर्णय घेतला जात आहे. मोफत लस द्यावी या बद्दल सर्वांची आग्रही मागणी आहे त्याबद्दल सर्वांना बोलायचा अधिकार आहे. प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करू शकतो पण याबद्दल योग्य तो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर करतील असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान राज्यात १ तारखेपासून लसीकरण कशा पद्धतीने होणार याबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत मात्र सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होताना दिसत आहे.

Leave a Comment