व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘नुपूर शर्माचं शिर धडावेगळं करणाऱ्याला माझं घर देईन’ अजमेर दर्गाच्या खादिमचं वादग्रस्त विधान

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर यांच्यावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. नुपूर शर्माच्या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे कन्हैया लाल आणि उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली यामुळे वातावरण अधिक तापले. या सगळ्यात घडामोडींमध्ये आता अजमेरच्या दर्ग्यामधील खादिम सलमान चिश्ती (salman chishti) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. एका व्हिडीओमध्ये त्यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या यांच्यावर बोलताना प्रक्षोभक विधानं केली आहे. त्याचा हा वादग्रस्त व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

काय म्हणाला खादिम सलमान चिश्ती?
व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान चिश्ती (salman chishti) हा मद्यधुंद अवस्थेत दिसला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता पोलीस सलमानचा शोध घेत आहेत. सलमानने (salman chishti) या व्हिडीओमध्ये म्हटलंय की आता पहिल्यासारखं नाही राहिलं, नाहीतर असं बोलला नसता. आईशप्पथ मी सरळ गोळ्याच घातल्या असत्या. मला माझ्या मुलांची शप्पथ, मी गोळ्या घातल्या असत्या आणि आजही छाती ठोकून सांगतोय, जो पण नुपूर शर्माचं शिर धडावेगळं करुन घेऊन येईल, त्याला माझं घर देईन आणि मी रस्त्यावर येईल, हे सलमानचं (salman chishti) वचन आहे!

https://twitter.com/SheetalPronamo/status/1544195234623410176

कोण आहे सलमान चिश्ती?
सलमान चिश्ती (salman chishti) हा एक हिस्ट्री शीटर आहे. त्याच्यावर अजमेरच्या दरगाह पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आता त्यानं केलेल्या प्रक्षोभक विधानामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी पथकंही तैनात केली आहेत.

वादग्रस्त विधान, हत्या आणि वाद
दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट करणाऱ्या दोघांची हत्या आतापर्यंत झाली आहे. उदयपूरच्या कन्हैया लालच्या हत्येनं संपूर्ण देश हादरला आहे. हि हत्या करण्याअगोदर सोशल मीडियात पोस्ट करत कन्हैया लाल याची हत्या करु, अशी चिथावणी देण्यात आली होती. यानंतर कन्हैया लाल याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत कन्हैय्या लालच्या मारेकऱ्यांना अटक केली आहे.

हे पण वाचा :
तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!

ED ची छापेमारी : ‘Vivo’सह भारतातील 44 कंपनीवर धडक कारवाई

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेच; फोटोंनी वेधलं लक्ष्य  

शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!

मुख्यमंत्री शिंदेंच्या घरातील भिंतीवर अजूनही ठाकरेंचं; फोटोंनी वेधलं लक्ष्य