Akash Deep : W W W …. पहिल्याच सामन्यात आकाश दीपने इंग्लंडला फोडला घाम (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्याच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना आजपासून रांची येथे सुरु झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताकडून प्रथमच कसोटी पदार्पण करणाऱ्या जलदगती गोलंदाज आकाश दीपने (Akash Deep) आपल्या भेद गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. आकाशने सुरुवातीला ३ बळी घेऊन इंग्लंडच्या बॅटिंग ऑर्डरचे कंबरडे मोडलं.

इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी डावाची सुरुवात केली. मात्र बेन डकेट अवघ्या ११ धावांवर बाद झाला. आकाश दीपच्या चेंडूवर यष्टीरक्षक ध्रुव जुरेलकडे झेल देत तो तंबूत परतला. यानंतर दोन चेंडूंची भर पडते न तोच पहिल्या सामन्यातील द्विशतवीर ऑली पोप शून्यावर बाद झाला. त्यानंतर आणखी १० धावांची भर पडताच जॅक क्रॉलीलाआकाश दीपने (Akash Deep) क्लीन बोल्ड केलं. सुरुवातीपासूनच आकाशने भेदक मारा केल्याचे पाहायला मिळालं. त्याच्या गोलंदाजीचा सामना करताना इंग्लिश फलंदाजांची चांगलीच भंबेरी उडाली.

कशी आहे आकाशची प्रथमश्रेणी कारकीर्द – (Akash Deep)

दरम्यान , 27 वर्षांचा आकाश दीप बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आल्याने त्याच्या बदली आकाश दीपला पदार्पणची संधी मिळाली. प्रशिक्षक द्रविडने त्याला कसोटी कॅप दिली. भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा तो ३१३वा खेळाडू ठरला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आकाश ने आत्तापर्यंत 30 प्रथमश्रेणी सामन्यात 104 बळी घेतले आहेत तर 28 लिस्ट ए सामन्यात 42 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने 41 टी-20 सामने सुद्धा खेळले असून त्यामध्ये त्याने 48 बळी घेतले आहेत.