हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, तेही चक्क मराठी चित्रपटात. होय .. दिग्दर्शक महेश मांजेरकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अक्षय कुमार शिवरायांच्या भूमिकेत दिसेल. नुकतंच या चित्रपटाचा शुभारंभ सोहळा पार पडला.
मुंबईत पार पडलेल्या या शुभारंभ सोहळ्यात अक्षय कुमारची ग्रँड एंट्रीही झाली . यावेळी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते . यावेळी चित्रपटाच्या लॉन्चिंगसोबतच अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांचा फर्स्ट लूकही लाँच करण्यात आला. वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि विशाल हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत
दरम्यान, राज ठाकरे यांच्यामुळेच मला ही भूमिका मिळाली असं अक्षय कुमारने म्हंटल. छत्रपती महाराजांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन अशी ग्वाही त्याने दिली. 2023 च्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.