हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात कडक निर्बंधांसहित लॉक डाऊन सुरु आहे. यामुळे प्रदर्शित होऊ घातलेले अनेक हिंदी चित्रपट पुन्हा रखडले आहेत. यात अक्षय कुमारचे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सूर्यवंशी’ आणि ‘बेलबॉटम’ देखील रखडले गेले आहेत. दरम्यान हे चित्रपट स्वातंत्र्य दिनादिवशी प्रदर्शित होणार अशी चर्चा रंगली होती. या चर्चांना पूर्णविराम देत अक्षयने स्वतःच चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक विधान केले आहे. यानंतर चाहत्यांची घोर निराशा झाली आहे. “या दोन्ही चित्रपटांचे निर्माते या चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेवर काम करत आहेत आणि योग्य वेळी याबाबत घोषणा केली जाईल.” असे अक्षयने म्हटले आहे.
https://www.instagram.com/tv/CMYq-2hnyJK/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, अक्षय कुमार ‘राम सेतु’ या चित्रपटाचे शूटिंग येत्या जूनपासून पुन्हा सुरू करणार असल्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे शूटिंग ४ जून ते २० जून या दरम्यान सुरू होऊ शकते. तसेच यासाठी निर्मात्यांनी एक योजना तयार केली आहे. निर्माते चित्रपटाच्या टीमसोबत बैठक घेऊन त्यांचा प्लान सुरू करण्याचा विचार करत आहेत.
https://www.instagram.com/p/CHj3GTpHV2v/?utm_source=ig_web_copy_link
चित्रपटाचे कलाकार आणि त्यांच्यासह क्रू-मेंबर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये श्रीलंकेला रवाना होतील. अक्षय कुमारच्या बेल बॉटम या स्पाय थ्रिलर चित्रपटात वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी आहेत. हा चित्रपट आधी मे महिन्यात प्रदर्शित होणार होता तर सूर्यवंशी ३० एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरीना कैफ दिसणार आहे.
https://www.instagram.com/p/CFyS9uEnD9r/?utm_source=ig_web_copy_link
अक्षय कुमार सध्या चित्रपटसृष्टीतील प्रचंड मागणी असलेला एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. बॉलिवूड जगतात त्याची खिलाडी म्हणून आगळी वेगळी अशी ओळख आहे. यामुळे त्याच्याकडे सध्या अनेक चित्रपट यादीत स्थित आहेत. त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपटांची नेहमीच प्रतीक्षा असते.
https://www.instagram.com/p/CIXXdsKHO8N/?utm_source=ig_web_copy_link
जर कोरोना महामारी बळावली नसती तर यातील अनेक चित्रपट नक्कीच प्रदर्शित झाले असते. अक्षय कुमार लवकरच सूर्यवंशी, बच्चन पांडे, बेलबॉटम, पृथ्वीराज, रक्षाबंधन, अतरंगी या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.