हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आपच्या एका कार्यकर्त्याने काँग्रेस उमेदवार आमदार अलका लांबा यांच्याबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याने लंबा यांनी या कार्यकर्त्यावर हात उगारला आहे. दिल्लीतील एका मतदान केंद्राजवळ हा प्रकार घडला. या प्रकारामुळे पररिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे.
काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेल्या अलका लांबा मतदान केंद्रावर आल्या होत्या. त्यावेळी संबंधित आपच्या कार्यकर्त्याने त्यांना कँग्रेसचा बिल्ला उतरवण्यास सांगितले. त्यावरून दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाली. त्याचवेळी या कार्यकर्त्याने अलका लांबा यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यामुळे संतापलेल्या अलका लांबा यांनी या कार्यकर्त्याच्या दिशेने धाव घेत त्याच्यावर हात उगारला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत आपच्या या कार्यकर्त्याला बाजूला नेले.
या प्रकारानंतर अलका लांबा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, ”मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पोलींग बूथवर आले होते. त्याचवेळी तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मला अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली. त्याने उच्चारलेले शब्द मी सांगू शकत नाही. आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता एका महिलेला अर्वाच्च शिविगाळ करवत होता.
#WATCH Delhi: Scuffle breaks out between AAP and Congress workers near Majnu ka Teela, Congress candidate Alka Lamba tries to slap an AAP worker. AAP leader Sanjay Singh has said the party will complain to Election Commission. #DelhiElections2020 (note: abusive language) pic.twitter.com/l5VriLUTkF
— ANI (@ANI) February 8, 2020
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.