नवी दिल्ली । ऑनलाइन गिफ्ट कार्ड पोर्टलने आपला डेटा डार्क वेबला (Dark Web) विकल्याची माहिती मिळाली आहे. या डेटामध्ये 3.3 लाख क्रेडिट आणि डेबिट कार्ड डिटेल्ससह 285 कोटी रुपयांच्या गिफ्ट कार्डचा देखील समावेश आहे. सायबर सिक्याेरिटी फर्म जेमिनी अॅडव्हायझरी (Gemini Advisory) ने याचा खुलासा केला आहे.
जेमिनी अॅडव्हायझरीनुसार फेब्रुवारी 2020 मध्ये प्रसिद्ध रशियन डार्क वेब हॅकर फाेरम वर या डेटाचा लिलाव होताना दिसून आला. या डेटाबेसचा आधीच लिलाव झाला आहे, असे सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये गिफ्ट कार्ड्ससह क्रेडिट आणि डेबिट कार्डची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
या ब्रँडचे गिफ्ट कार्ड्स
माहितीनुसार, डार्क वेबवर जे गिफ्ट कार्ड्स डेटाबेस सापडले त्यांमध्ये ते अॅमेझॉन, एअरबीएनबी, मॅरियट, नाईके, वॉलमार्ट आदींचे आहेत. हॅकर्स या चोरी झालेल्या गिफ्ट कार्ड्सची विक्री दहा हजार डॉलर्सच्या लिलावाच्या किमतीवर करत असल्याचीही बातमी आहे. तर, थेट खरेदी केल्यावर त्यांची किंमत 15 हजार डॉलर्स म्हणजेच 11 लाख भारतीय रुपये इतकी आहे.
क्रेडिट कार्ड माहितीसाठी इतक्या रुपयांची बाेली
जेमिनी अॅडव्हायझरीनुसार हेही दिसून आले आहे की, हॅकर्सनी 15 हजार डॉलर्समध्ये 3.3 लाख क्रेडिट आणि डेबिट कार्ड डिटेल्स विकले आहेत. या अहवालात असेही म्हटले गेले आहे की, बहुतेक सायबर गुन्हेगार कंपन्यांनी त्या गिफ्ट कार्ड्सना बंद करण्यापूर्वीच लवकरात लवकर या कार्डमधून पैसे काढतात. या अहवालानुसार,हे दोन्ही डेटाबेस गिफ्ट कार्ड ऑक्शन प्लॅटफॉर्म कार्डपूल वरून घेण्यात आला आहे, जो कोविड दरम्यान बंद झाला होता आणि तो अमेरिकेत खूपच लोकप्रिय होता.
बिटकॉइनमार्फत डेटा अघोषित किंमतीवर विकला जातो.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,” क्रिप्टो करन्सी बिटकॉइनच्या माध्यमातून असा डेटा अज्ञात किंमतीमध्ये डार्क वेबवर विकला जात आहेत. या डेटासाठी, हॅकर्स टेलिग्रामद्वारे देखील संपर्क साधत आहेत. ज्यावर युझर्सचा डेटा स्टोअर करण्यासाठी पेमेंट कार्ड इंडस्ट्री डाटा सिक्योरिटी स्टॅण्डर्ड (PCIDSS) चे पालन करते. कार्ड फिंगरप्रिंट तयार करण्यासाठी हॅकर्स हॅश अल्गोरिदम वापरू शकत असल्यास ते मास्कस्ड कार्ड नंबर देखील डिक्रिप्ट करू शकतात. अशा परिस्थितीत सर्व कार्डधारकांचे अकाउंट धोक्यात येऊ शकते.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा