हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अली जफर हे नाव बॉलिवूड जगतातील ऐकीव नावांपैकी एक आहे. अली फक्त एक अभिनेताच नव्हे तर एक उत्तम लेखक, गायक आणि पेंटरसुद्धा आहे. खरतर अली जफर हा मूळ पाकिस्तानी आहे. या पाकिस्तानी कलाकाराने बॉलिवूडमध्ये आपल्या कलेच्या जोरावर खास ओळख निर्माण केली आहे. मात्र आपल्या देशात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आल्यानंतर त्याला पाकिस्तानला परतावे लागले. आज अली जफरचा ४१ वा वाढदिवस आहे. तर यानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी. अली जफर एक उत्तम अभिनेता आहेच. पण त्यासोबत तो एक उत्तम सिंगर आणि पेंटर सुद्धा आहे.
https://www.instagram.com/p/CNNenAalvPf/?utm_source=ig_web_copy_link
१८ मे १९८० मध्ये लाहोर, पाकिस्तान येथे अली जफरचा जन्म झाला. शाळेत असताना तो अभ्यासात फार हुशार होता. त्याने दहावीमध्ये पहिला क्रमांक देखील पटकावला होता. अभिनेता म्हणून लोक त्याला ओळखण्याआधी तो स्केच आणि पोर्ट्रेट तयार करायचा. काही काळानंतर तो गायक म्हणून चित्रपटांची गाणी गाऊ लागला. मात्र त्याला गायक म्हणून ओळख मिळाली ती ‘चनू’ मुळे. हे गाणे त्याच्या ‘हुक्का पाणी’ या म्युझिक अल्बममधील आहे.
https://www.instagram.com/p/yEYymPNuqU/?utm_source=ig_web_copy_link
अली अभिनयासोबत ‘गुड लुक्स’ साठी देखील चांगलाच प्रसिद्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०१२ मध्ये अली जफर ‘आशियाई मोस्ट सेक्सीइस्ट मॅन’ च्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याच्या पुढच्याच वर्षी तो या यादीत प्रथम क्रमांकावर होता. हा रिपोर्ट ब्रिटीश वृत्तपेपर ‘इस्टर्न आय’कडून जाहीर करण्यात आला होता.
https://www.instagram.com/p/CILOg4HF8C6/?utm_source=ig_web_copy_link
अली जफरने २००९ साली त्याची गर्लफ्रेंड आयेशा हिच्यासोबत लग्न केले होते. आयेशाशी अलीची भेट स्केच आणि पोर्ट्रेट बनवत असताना झाली होती. असे म्हटले जाते कि अळीची पत्नी आयेशा हि बॉलिवूड अभिनेता अमीर खानची लांबची नातेवाईक आहे. २००८ साली आयेशा आणि अली एका डेटसाठी गेले असता त्यांना किडनॅप करण्यात आले होते. या दोघांना सोडविण्यासाठी यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची रक्कम द्यावी लागली होती.
https://www.instagram.com/p/CE7AdQwFj_S/?utm_source=ig_web_copy_link
अली जफरने ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर मेरे ब्रदर की दुल्हन, चष्मे बद्दूर, लंडन पॅरिस न्युयॉर्क यांसारख्या चित्रपटांत त्याने काम केल आहे.