हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगात लाखो प्रकारचे जीव राहतात. असे अनेक जीव आहेत ज्यांची आपल्याला माहितीही नाही. ऑस्ट्रेलियात एका व्यक्तीला असाच एक विचित्र प्राणी मृतावस्थेत समुद्राच्या किनाऱ्यावर दिसला. जेव्हा त्या व्यक्तीने तो प्राणी समुद्र किनाऱ्यावर पाहिला तेव्हा तोही थक्क झाला कारण या प्राण्याची रचना एलियनसारखी दिसत होती. त्यामुळे त्या व्यक्तीने त्याला एलियनही म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील एका प्रसिद्ध बीचवर एक रहस्यमय प्राणी आला, ज्याला पाहून स्थानिक लोक थक्क झाले. तेथील स्थानिक रहिवासी असलेल्या अॅलेक्स टॅनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर या विचित्र प्राण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सरपटणाऱ्या प्राण्यासारखे या प्राण्याचे शरीर आहे. मऊ त्वचा, लांब शेपटी आणि त्याला पंजे आहेत.
https://www.instagram.com/reel/Cbr1F0ljeK2/?utm_medium=copy_link
यावेळी अॅलेक्सने सांगितले की, तो मारूचिडोर बीचवर मॉर्निंग वॉक करत असताना त्याला हा प्राणी दिसला. तो म्हणाला की मला हा प्राणी पाहून विचित्र वाटत असून तेथील लोकांना तो प्राणी एलियन्स असल्यासारखे वाटत आहे.
अॅलेक्स म्हणाले की या विचित्र प्राण्याच्या शरीरावर केस नव्हते. तो एक पूर्णपणे वेगळा प्राणी होता जो त्याने पहिल्यांदाच पाहिला होता. अॅलेक्सने जेव्हा या प्राण्याचा व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा काही कमेंट करणाऱ्यांनी हा व्हिडिओ वन्यजीव तज्ञांना टॅग केला. तर काही लोक म्हणाले की कदाचित तो बुडलेला कांगारू किंवा वालबी असावा. आता तुम्हीच सांगा हा कोणता प्राणी आहे असे तुम्हाला वाटते?