“बाल शोषण अन अत्याचारा विरोधात कडक कायदा करा”; प्रतिभाताई शेलार यांची मागणी
सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहरात बाल शोषण व अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. याबाबत महालक्ष्मी आधार फाऊंडेशनच्या संस्थापिका प्रतिभाताई शेलार यांच्यावतीने काल भारत सरकारला निवेदन देण्यात आले. यावेळी साताऱ्यात अल्पवयीन बालकांच्या शोषण व अत्याचार विरोधात केंद्र सरकारच्यावतीने कडक कायदे करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
प्रतिभाताई शेलार यांनी भारत सरकारला लिहलेले निवेदन हे जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल यांना देण्यात आले. शेलार यांनी निवेदनात म्हंटले आहे की, सातारा जिल्हा व शहरी भागात मोठ्या प्रमाणात बालशोषण आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या ठिकाणी कायदा सुव्यवस्था औपचारिकपणे पार पडत आहे. मात्र, कायद्याचे उलंघन करणाऱ्याला कडक शिक्षा हि झालीच पाहिजे.
त्यामुळे निवेदनाद्वारे मागणी करत आहे की, बाल शोषण आणि अत्याचारा विरोधात कडक कायदा तयार करण्यात यावा. तसेच कायदा केल्या नंतर त्याची अंलबजावणी करण्याचे आदेशही दिले जावेत, अशी मागणी प्रतिभाताई शेलार यांनी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.